शिपाई झाला बांधकाम समितीचा सभापती; कोपरगाव नगरपालिकेत शिपाई असलेल्या कदम यांचा थक्क करणारा प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2018 07:41 PM2018-01-08T19:41:34+5:302018-01-08T19:41:58+5:30

कोपरगाव नगरपालिकेच्या बांधकाम खात्यात २१ वर्षांपूर्वी शिपाई म्हणून काम करणारे विद्यमान नगरसेवक जनार्दन कदम हे त्याच खात्याचे सभापती झाले आहेत. कदम यांचा राजकीय प्रवास थक्क करणारा आहे.

The Speaker was the Chairman of the Construction Committee; Traveling around the city of Kopargaon is a terrific journey of the soldiers | शिपाई झाला बांधकाम समितीचा सभापती; कोपरगाव नगरपालिकेत शिपाई असलेल्या कदम यांचा थक्क करणारा प्रवास

शिपाई झाला बांधकाम समितीचा सभापती; कोपरगाव नगरपालिकेत शिपाई असलेल्या कदम यांचा थक्क करणारा प्रवास

Next

कोपरगाव : नगरपालिकेच्या बांधकाम खात्यात २१ वर्षांपूर्वी शिपाई म्हणून काम करणारे विद्यमान नगरसेवक जनार्दन कदम हे त्याच खात्याचे सभापती झाले आहेत. कदम यांचा राजकीय प्रवास थक्क करणारा आहे.
शहराच्या निवारा प्रभाग क्रमांकमध्ये राहणारे कदम बारावीत शिकताना तत्कालीन नगराध्यक्षा सुहासिनी कोयटे यांच्या १९९६ साली कारकिर्दीत अवघ्या ७००रूपये प्रतिमाह मानधनावर हंगामी शिपाई म्हणून रूजु झाले. एका वर्षात त्यांची नोकरी गेली. पुढे सदगुरू गंगागिर महाराज महाविद्यालयात बी.ए.ची घेतली. समता पतसंस्थेत शिपाई झालेले कदम हे पुढे लिपीक, वसुली अधिकारी व आता विशेष वसुली अधिकारी झाले. २१ वर्षाच्या ध्येयाधिष्टीत प्रवासात कदम यांचा जनसंपर्क वाढला. नगरपालिका निवडणुकीत साई संस्थानचे विश्वस्त बिपीन कोल्हे, आमदार स्नेहलता कोल्हे व कोयटे यांच्यामुळे ते भाजपाचे नगरसेवक म्हणून निवडून आले. नुकतीच त्यांची बांधकाम समिती सभापतीपदी वर्णी लागली आहे. ‘शिपाई ते सभापती’ असा कदम यांचा राजकीय प्रवास थक्क करणारा आहे.

Web Title: The Speaker was the Chairman of the Construction Committee; Traveling around the city of Kopargaon is a terrific journey of the soldiers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.