सोनईच्या व्यंकटेश पतसंस्थेत १ कोटी ९३ लाखांचा अपहार; व्यवस्थापकासह तिघांविरुध्द गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2018 06:50 PM2018-02-06T18:50:51+5:302018-02-06T18:51:12+5:30

एक वर्षात १ कोटी ९३ लाखांचा अपहार केल्याच्या आरोपावरुन सोनई पोलिसांनी सोनई येथील व्यंकटेश पतसंस्थेच्या व्यवस्थापकासह तिघाजणांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. हे तिघेही फरार आहेत.

Soni's Vyankateesh Credit Society worth 1 crore 93 lakh; The crime against the trio with the manager | सोनईच्या व्यंकटेश पतसंस्थेत १ कोटी ९३ लाखांचा अपहार; व्यवस्थापकासह तिघांविरुध्द गुन्हा

सोनईच्या व्यंकटेश पतसंस्थेत १ कोटी ९३ लाखांचा अपहार; व्यवस्थापकासह तिघांविरुध्द गुन्हा

googlenewsNext

सोनई : एक वर्षात १ कोटी ९३ लाखांचा अपहार केल्याच्या आरोपावरुन सोनई पोलिसांनी सोनई येथील व्यंकटेश पतसंस्थेच्या व्यवस्थापकासह तिघाजणांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. हे तिघेही फरार आहेत.
याबाबत लेखापाल सुविद्या सोमाणी यांनी फिर्याद दिली. त्यांनी फिर्यादीत म्हटले आहे, १ एप्रिल २०१६ ते ३१ मार्च २०१७ या कालावधीत पतसंस्थेचे व्यवस्थापक शामसुंदर शंकर खामकर, लिपीक गणेश हरिभाऊ मोरे व रोखपाल गणेश अंबादास तांदळे यांनी पदाचा दुरुपयोग करुन स्वत:च्या फायद्यासाठी बेकायदेशिररित्या बनावट सही, शिक्क्याचा वापर करुन संस्थेची १ कोटी, ९३ लाख ७ हजार ६०६ रुपयांचा अपहार केला.
या फिर्यादीनुसार सोनई पोलिसांनी या तिघांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे. व्यंकटेश पतसंस्था सोनई परिसरात नामांकीत पतसंस्था असून ही व्यापारी पतसंस्था म्हणून ओळखली जाते. वर्षांपासून ठेव पावतीची मुदत संपूनही ठेवीदारांना ठेवी परत न मिळाल्याने संस्थेच्या कामकाजावर संशय व्यक्त करण्यात येत होता. ठेवी परत मिळाव्यात यासाठी काही ठेवीदारांनी अलिकडे उपोषण केले होते.

Web Title: Soni's Vyankateesh Credit Society worth 1 crore 93 lakh; The crime against the trio with the manager

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.