सेनेत दुसरी फळी नव्हे दुफळी

By admin | Published: June 29, 2014 11:23 PM2014-06-29T23:23:27+5:302014-06-30T00:34:04+5:30

अहमदनगर : शिवसेनेमध्ये गेल्या २५ वर्षांपासून आमदार अनिल राठोड यांचे पक्षावर हुकमी वर्चस्व आहे. राठोड यांच्यानंतर शिवसेनेत दुसरी फळी तयार होत नसल्याचे दिसते आहे.

Sena does not have any other fringe | सेनेत दुसरी फळी नव्हे दुफळी

सेनेत दुसरी फळी नव्हे दुफळी

Next

अहमदनगर : शिवसेनेमध्ये गेल्या २५ वर्षांपासून आमदार अनिल राठोड यांचे पक्षावर हुकमी वर्चस्व आहे. राठोड यांच्यानंतर शिवसेनेत दुसरी फळी तयार होत नसल्याचे दिसते आहे. एखादा नेता तयार व्हायला लागला की तो शिवसेनेतून बाहेर पडलेला असतो. पक्षामध्ये राहिलेच तर दुफळी तयार होते. हाच इतिहास आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पेटला आहे. शिवसेनेमध्ये तयार झालेल्या दुफळीचे लोण युवासेनेतही पसरले आहे. अनिल राठोड यांना प्रा. शशिकांत गाडे यांनी, तर युवा सेनेत विक्रम राठोड यांना योगीराज गाडे यांनी शह दिल्यामुळे पक्षामध्येच कलहाची आग भडकली आहे.
विधानसभेच्या तोंडावर पक्ष सदस्य नोंदणी मोहीम जोरदारपणे सुरू झाली आहे. दरवर्षी सदस्यता नोंदणीचा एकत्रित शुभारंभ होतो. शिवसेनेमध्ये पूर्वीपासूनच शहर आणि जिल्हा अशी विभागणी आहे. तरीही सदस्यता नोंदणीचे कार्यक्रम एकत्र सुरू व्हायचे. शहराच्या प्रत्येक कार्यक्रमाला पूर्वी शशिकांत गाडे हजर असायचे. यावेळी प्रा. गाडे आणि राठोड यांच्यामध्ये दरी निर्माण झाली आहे. त्यामुळे गाडे आणि राठोड यांनी स्वतंत्र पत्रकार परिषदा घेऊन सदस्यता नोंदणीचा वेगवेगळा कार्यक्रम आखला आहे. सेनेत दुसऱ्या फळीतील नेता तयार होत नाही़ नेता व्हायचे असेल तर त्याला शिवसेना सोडावीच लागते, हाच सेनेचा इतिहास राहिला आहे. त्यामुळे दुफळी ही ठरलेली आहे. ती विधानसभेमध्ये आक्रमक राहण्याची शक्यता आहे.
केंद्रात नरेंद्र मोदीचे सरकार आल्यामुळे महाराष्ट्रातही युतीची सत्ता येईल, अशी आशा आता सर्वांनाच लागली आहे. या मोदी लाटेवर प्रा. गाडे स्वार झाले असून त्यांनीही विधानसभा लढविण्यासाठी तलवार उपसली आहे. त्यासाठी उद्धव ठाकरे यांच्याकडे लॉबिंग केल्याची माहिती आहे. त्यामुळे राठोड यांना स्वपक्षातूनच आव्हान निर्माण झाले आहे. गाडे यांनी नगरबरोबरच श्रीगोंद्यातूनही चाचपणी सुरू केल्याची माहिती आहे. शिवसेनेतील दुफळीचे लोण युवासेनेतही पसरले आहे. शिर्डीत युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे आले त्यावेळी विक्रम राठोड आणि योगीराज गाडे या दोघांनीही ठाकरेंकडे युवासेनेची जबाबदारी घेण्यास समर्थता दाखविली आहे. युवासेनेची जबाबदारी कोणावर येऊन पडणार हे आता जुलैमध्येच कळणार आहे़ (प्रतिनिधी)

Web Title: Sena does not have any other fringe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.