सहकारी संस्थांची माहिती मागविली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2021 04:19 AM2021-02-08T04:19:38+5:302021-02-08T04:19:38+5:30

.... विद्युत विभागातील काम पुन्हा ठप्प अहमदनगर: महापालिकेच्या विद्युत विभाग प्रमुख म्हणून आर.जी. मेहत्रे यांची नियुक्ती करण्यात आली ...

Requested information of co-operative societies | सहकारी संस्थांची माहिती मागविली

सहकारी संस्थांची माहिती मागविली

Next

....

विद्युत विभागातील काम पुन्हा ठप्प

अहमदनगर: महापालिकेच्या विद्युत विभाग प्रमुख म्हणून आर.जी. मेहत्रे यांची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, मेहत्रे यांनी या विभागाचे काम पाहण्यास नकार दिला आहे. तसे पत्र त्यांनी सामान्य प्रशानास दिले आहेत. त्यामुळे विद्युत विभागातील काम पुन्हा ठप्प झाले आहे. त्याचा परिणाम शहरातील विद्युतच्या कामांवर झाला आहे.

....

कार्यारंभ आदेशास विलंब

अहमदनगर: महापालिकेच्या अंदाजपत्रकातील कामे मागील महिन्यात प्रस्तावित करण्यात आली आहे. पदाधिकाऱ्यांनी सुचविलेल्या कामांची अंदाजपत्रके तयार करणे, निविदा नोटीस प्रसिद्ध करणे आदी कामांना विलंब झाला आहे. अंदाजपत्रकात प्रस्तावित कामांसाठी अद्याप कार्यारंभ आदेश न मिळाल्याने कामे लांबणीवर पडली आहेत.

...

महिलांसाठी वाण आरोग्याचे उपक्रम

अहमदनगर : शहर महिला राष्ट्रवादी काँग्रेस व डॉक्टर सेल यांच्या संयुक्त विद्यमाने ‘वाण आरोग्याचे’ उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या उपक्रमांतर्गत घेण्यात आलेल्या मोफत नेत्ररोग तपासणी शिबिराचे उद्घाटन आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महिला शहर जिल्हाध्यक्षा रेशमा आठरे, नगरसेवक कुमार वाकळे, डॉक्टर सेलचे अध्यक्ष डॉ.रणजीत सत्रे, नेत्ररोग तज्ज्ञ डॉ.व्हेरॉणिका फ्रान्सिस, अरविंद शिंदे, युवती अध्यक्षा अंजली आव्हाड, ओबीसी शहराध्यक्ष अमित खामकर, युवराज शिंदे आदी उपस्थित होते.

...

समाधान गीते यांचा गौरव

अहमदनगर : मार्केट यार्डमधील हमाल माथाडी कामगाराचा मुलगा समाधान शिवाजी गीते हा सीए परीक्षेमध्ये चांगले गुण मिळवून उत्तीर्ण झाल्याबद्दल, त्याचा आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी अरविंद शिंदे, काका शेळके, नीलेश शिंदे, युवराज शिंदे, संतोष लांडे, ॲड.जयंत जाधव, राम वाघ, वैभव वाघ, सचिन मुदगल, राजू वामन, सनी शिंदे, सनी आगरकर, हरिभाऊ यलदंडी, राजू दातरंगे, डॉ.हराळ आदी उपस्थित होते.

Web Title: Requested information of co-operative societies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.