खाजगी दूध धंद्याला चाप लावणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2017 07:49 PM2017-08-23T19:49:09+5:302017-08-23T19:50:01+5:30

ग्रामीण भागातील खाजगी दूध व्यावसायिक व खाजगी दूध संकलन संस्थांना भविष्यात चाप लावून सहकारी दूध उत्पादक संस्थांना बळकटी देणार असल्याचे दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी ब्राह्मणवाडा (ता. अकोले) येथे सांगितले.

Private milk business will be tapped | खाजगी दूध धंद्याला चाप लावणार

खाजगी दूध धंद्याला चाप लावणार

Next
ठळक मुद्देमहादेव जानकर ३० रूपये भाव वाढीचे आश्वासन
राह्मणवाडा : ग्रामीण भागातील खाजगी दूध व्यावसायिक व खाजगी दूध संकलन संस्थांना भविष्यात चाप लावून सहकारी दूध उत्पादक संस्थांना बळकटी देणार असल्याचे दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी ब्राह्मणवाडा (ता. अकोले) येथे सांगितले. खाजगी भेटीसाठी ते येथे आले असता त्यांनी ‘लोकमत’ ही माहिती दिली. येथील श्रीकृष्ण दूध उत्पादक संस्था,दूध शीतकरण केंद्र व ग्रामपंचायतीस भेट देऊन माहिती घेतली. एका छोट्याशा खेडेगावातील अडीच हजार लिटर दूध संकलन व शीतकरण केंद्र पाहून ते थक्क झाले. यावेळी त्यांनी परिसरातील दूध उत्पादक व ग्रामस्थांशी चर्चा केली. येथील श्रीकृष्ण दूध उत्पादक संस्थेचे संस्थापक संचालक गोकूळ आरोटे यांनी गाईच्या दुधास किमान तीस रुपये भाव करण्याची मागणी केली. मंत्री जानकर यांनी भविष्यात ३.५ व ८.५ गुणप्रतिच्या दुधास तीस रुपये भाव वाढ करण्याचे आश्वासन दिले. हे सरकार दूध उत्पादक शेतकºयांना दिलासा देईल तसेच त्यांच्या पाठीमागे उभे राहील, असे सांगून ब्राह्मणवाडा गावचा परिसर,प्रतिकूल परिस्थितीवर कष्ट आणि मेहनतीने मात करणाºया येथील शेतकºयांचे जानकर यांनी कौतुक केले. गोकूळ आरोटे,माजी सरपंच एल.बी.आरोटे ,धोंडीभाऊ चव्हाण,रवींद्र हांडे,शंकर हांडे,उपसरपंच भारत आरोटे व सदस्यांनी जानकर यांचा सत्कार केला.

Web Title: Private milk business will be tapped

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.