पथदिवे घोटाळा : रोहिदास सातपुते न्यायालयीन कोठडीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2018 05:50 PM2018-05-26T17:50:35+5:302018-05-26T17:50:35+5:30

महापालिका पथदिवे घोटाळ्यातील सूत्रधार रोहिदास सातपुते यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. सातपुतेची पोलीस कोठडी संपल्याने त्याला शनिवारी जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले होते.

Pathdiive scam: Rohidas Satpute in judicial | पथदिवे घोटाळा : रोहिदास सातपुते न्यायालयीन कोठडीत

पथदिवे घोटाळा : रोहिदास सातपुते न्यायालयीन कोठडीत

googlenewsNext

अहमदनगर : महापालिका पथदिवे घोटाळ्यातील सूत्रधार रोहिदास सातपुते यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. सातपुतेची पोलीस कोठडी संपल्याने त्याला शनिवारी जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले होते.
न्यायालयासमोर तपासी अधिकारी पोलीस निरिक्षक सुरेश सपकाळे व सरकारी पक्षाने सातपुतेची कोठडी वाढवून देण्याची मागणी केली. मात्र आरोपी पक्षाने केलेल्या युक्तीवादानंतर न्यायालयाने सातपुतेला न्यायालयीन कोठडी दिली. गुन्हा दाखल झाल्यापासून सातपुते फरार होता.  न्यायालयाने त्याच्या विरोधात स्टॅडिंग वॉरंट काढल्यानंतर तो तोफखाना पोलीस ठाण्यात हजर झाला. महापालिकेत संगनमताने झालेल्या ३४ लाख ६५ हजार ४४१ रुपयांचा पथदिवे घोटाळ्यात सातपुते मुख्य सूत्रधार असल्याचा आरोप आहे. पोलीस कोठडी दरम्यान मात्र सातपुते याने पोलीसांना अपेक्षित अशी काहीच माहिती दिली नसल्याचे समजते.

 

Web Title: Pathdiive scam: Rohidas Satpute in judicial

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.