One killed, one collapsed from the bridge and a collapsed car on the Pune road | पुणे रोडवरील अपघातात एक ठार, पुलावरुन खाली कोसळली कार
पुणे रोडवरील अपघातात एक ठार, पुलावरुन खाली कोसळली कार

सुपा (जि. अहमदनगर) : चालकाचे नियंत्रण सुटल्याने भरधाव कार ओढ्याच्या पुलावरून खाली कोसळून झालेल्या नगर-पुणे मार्गावर झालेल्या अपघातात एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला तर तिघे जखमी झाले. ही घटना पारनेर तालुक्यातील सुप्याजवळील जांभूळ ओढा गावाजवळ रविवारी दुपारी साडेबारा वाजता घडली.

ओंकार शिवाजी नवले (वय १८), असे मृताचे नाव आहे, तर अभिषेक शशिकांत नवले (दोघेही रा. कारेगाव, ता. शिरूर, जि. पुणे) असे जखमी तरुणाचे नाव आहे. इतर दोघा जखमींची ओळख पटू शकली नाही. नगर-पुणे रस्त्यावरून शिरूर तालुक्यातील कारेगाव येथील चौघे कारमधून पुण्याहून नगरच्या दिशेने चालले होते. दुपारी साडेबाराच्या सुमारास एमआयडीसीजवळील जांभूळ ओढा पुलावर असताना चालकाचा कारवरील ताबा सुटला. भरधाव कार पुलावरून नदीत कोसळली. जखमींंपैकी अन्य दोघा जखमींची ओळख पटू शकली नाही. कारेगावमधून चौघे कारमधून राहुरी येथे लग्नाच्या कार्यक्रमासाठी जात होते, अशी माहिती पोलिसांनी दिली. अपघातातील मृत ओंकार नवले याचा शनिवारीच वाढदिवस होता. वाढदिवसाच्या दुसºयाच दिवशी त्याच्यावर काळाने घाला घातला. याबाबत रूईछत्रपती येथील सुशांत सुरेश गायकवाड यांनी सुपा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या वाहनाचा चालक नेमका कोण होता? याचा शोध पोलीस घेत आहेत.


Web Title: One killed, one collapsed from the bridge and a collapsed car on the Pune road
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.