नगर मनपा निवडणूक २०१८ : सोशल मीडियावर प्रचाराचा जोर-शोर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2018 12:06 PM2018-11-24T12:06:01+5:302018-11-24T12:06:19+5:30

शहरात महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सध्या जोरात सुरू असून, सोशल मीडियावरही प्रचाराचा चांगलाच ज्वर चढला आहे़

Municipal Elections 2018: Promotional campaign on social media | नगर मनपा निवडणूक २०१८ : सोशल मीडियावर प्रचाराचा जोर-शोर

नगर मनपा निवडणूक २०१८ : सोशल मीडियावर प्रचाराचा जोर-शोर

Next

अहमदनगर : शहरात महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सध्या जोरात सुरू असून, सोशल मीडियावरही प्रचाराचा चांगलाच ज्वर चढला आहे़ सर्वच पक्षाचे उमेदवार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचे फोटो, प्रभाग क्रमांक आणि पक्षाचे चिन्ह फेसबुक, व्हॉटसअ‍ॅपवर झळकत आहेत.
आपले मत म्हणजे विकासाला मत, आता गुलाल आम्हीच उधळणार, किंंग ईज बॅक, आवाज कुणाचा, सर्वांगीण विकास हवा असेल तर मत दादा-भाऊलाच अशा आशयांच्या घोषवाक्यांच्या माध्यमातून उमेदवार सोशल मीडियावर प्रचार करत आहेत़ उमेदवाराच्या फोटोसह आकर्षक जाहिरात तयार करून प्रभागाचा आम्हीच कसा विकास करणार याचे विश्लेषणही सोशल मीडियावर दिले जात आहे़ आॅडिओ क्लिप, व्हिडिओ क्लिपचाही सध्या सर्वत्र आवाज घुमत आहे़ सध्या सर्वांच्याच हातात अ‍ॅन्ड्रॉईड मोबाईल दिसतात़ होम टू होम आणि रस्त्यावरील प्रचारासह सोशल मीडियावरील प्रचारातून उमेदवारांना मतदारांपर्यंत सहज पोहोचता येते़ त्यामुळे सर्वच उमेदवारांनी सोशल प्रचारासाठी स्वतंत्र यंत्रणा कार्यान्वित केली आहे़ आपलाच उमेदवार जनतेचे कसे भले करणार हे सांगणाऱ्या पोस्ट सध्या जोरदारपणे व्हायरल होत आहेत़ या पोस्टच्या माध्यमातून प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरित्या विरोधी उमेदवारांवरही टीकास्त्र सोडले जात आहेत़ ९ डिसेंबर रोजी महापालिका निवडणुकीसाठी मतदान होत आहे़ त्यामुळे येत्या काही दिवसांत सोशल मीडियावर प्रचाराची रणधुमाळी आणखीणच रंगणार आहे.
शहर विकासाचे कैवारी
महापालिकेची निवडणूक जाहीर होताच अनेकांना शहरातील प्रलंबित प्रश्नांची जाणीव झाली आहे़ हे प्रश्न आपणच कसे मार्गी लावू शकतो याचे दावे-प्रतिदावे सध्या सोशल मीडियावरून सुरू आहेत़ अनेक उमेदवारांनी आपल्या प्रभागातील मतदारांचे ग्रुप तयार केले आहेत़ या गु्रपवर दिवसभर उमेदवाराच्या प्रचाराच्या पोस्ट टाकल्या जात आहेत.
पब्लिसिटी एजन्सी कार्यरत
बहुतांशी उमेदवारांनी प्रचार आणि इतर नियोजनाची जबाबदारी पब्लिसिटी एजन्सीला दिली आहे़ यामध्ये सोशल मीडिया, एसएमएस, एलईडी डिस्प्ले व्हॅन, उमेदवारांचा माहितीपट आदी हायटेक प्रचाराच्या सुविधा पुरविल्या जात आहेत.

Web Title: Municipal Elections 2018: Promotional campaign on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.