व्यसनासाठी मोटारसायकलींची चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2018 16:42 IST2018-06-16T16:41:32+5:302018-06-16T16:42:29+5:30
केवळ व्यसनांचा खर्च भागवण्यासाठी अल्पवयीन आरोपी मोटारसायकल चोऱ्या करून विकत असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.

व्यसनासाठी मोटारसायकलींची चोरी
अहमदनगर : केवळ व्यसनांचा खर्च भागवण्यासाठी अल्पवयीन आरोपी मोटारसायकल चोऱ्या करून विकत असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.
तोफखाना पोलिसांनी संशयावरून दिल्लीगेट येथून आरोपीस अटक केली. त्याच्याकडे अधिक तपास केला असता, त्याने मोटारसायकली चोरी केल्याचे कबूल केले. या गाड्या त्याने कल्याण रोडवरील गणेशनगर येथे नातेवाईकांच्या घरामागे लपवून ठेवल्याचे सांगितले. तोफखाना पोलिसांनी या पाच मोटारसायकली हस्तगत केल्या आहेत. व्यसनाची पूर्तता करण्यासाठी आपण गाड्या चोरत असल्याची धक्कादायक माहिती आरोपीने दिली. त्याला आता बाल न्यायालयासमोर हजर केले जाईल.