विखेंना काँगे्रसमध्येच जास्त विरोधक, मुख्यमंत्र्यांकडून विखेंचे कौतुक

By admin | Published: July 8, 2017 08:47 PM2017-07-08T20:47:12+5:302017-07-08T20:47:12+5:30

भविष्यात काय होईल, हे आज सांगणे उचित नाही, असे मुख्यमंत्र्यांनी म्हणताच विखेंच्या भाजप प्रवेशाची चर्चा शिर्डीत जोरदार रंगली़

More than Opposition Congress in Wichanna Cong, Praise of Chief Minister | विखेंना काँगे्रसमध्येच जास्त विरोधक, मुख्यमंत्र्यांकडून विखेंचे कौतुक

विखेंना काँगे्रसमध्येच जास्त विरोधक, मुख्यमंत्र्यांकडून विखेंचे कौतुक

Next

आॅनलाइन लोकमत
शिर्डी, दि़ ८ - विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांना काँगे्रसमध्येच जास्त विरोधक आहेत़ विखे आणि माझी चांगली मैत्री आहे़ ते माझ्याकडे कधीच चुकीचं काम घेऊन आले नाहीत, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांचे कौतुक केले़ भविष्यात काय होईल, हे आज सांगणे उचित नाही, असे मुख्यमंत्र्यांनी म्हणताच विखेंच्या भाजप प्रवेशाची चर्चा शिर्डीत जोरदार रंगली़
शिर्डी नगरपंचायतीच्या अटल अमृत पाणी योजनेच्या शुभारंभप्रसंगी मुख्यमंत्री बोलत होते़ मुख्यमंत्री म्हणाले, गुरू पूजनाच्या मुहूर्तावर सार्इंचा आशीर्वाद मिळाला तसेच साई शताब्दी सोहळा माझ्या काळात होत आहे, हे माझं भाग्यच आहे़ अटल अमृत योजनेतून शिर्डीचा पाणी प्रश्न सोडविणार आहे़ आता जगभरातील भाविकांसाठी शिर्डीत मोठ्या प्रमाणात विकास कामे हाती घेण्यात येणार आहेत़ नगरपंचायतीच्या सर्व मागण्या लवकर पूर्ण करणार आहे़ निळवंडे धरणाच्या कालव्यांची कामे मार्गी लावणार असून, या कामांसाठी साईबाबांचा घेतलेला पैसा परत करणार आहे़ भाजपने राज्यातील सर्वात मोठी कर्जमाफी दिली़ रोज निर्णय बदलत नाही़ पण लोकांच्या हितासाठी काही बदल करावा लागतो. पुर्नगठीत कर्जदारांसाठी उचित व्यवस्था केली आहे़ ती लवकरच जाहीर करणार आहे़ शिर्डी विमानतळ लवकरच सुरू करुन नाईट लँडिंग सुविधाही सुरु करणार आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले़

Web Title: More than Opposition Congress in Wichanna Cong, Praise of Chief Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.