प्रेमप्रकरणातून मित्राचाच खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2018 06:09 PM2018-10-12T18:09:44+5:302018-10-12T18:10:45+5:30

संगमनेर तालुक्यातील तिगाव येथील कनिष्ठ महाविद्यालयात बारावीत शिकणाऱ्या युवकाचा प्रेमप्रकरणातून मित्रानेच धारदार चाकूने भोसकून निर्घृण खून केला.

Mitra's murder from love affair | प्रेमप्रकरणातून मित्राचाच खून

प्रेमप्रकरणातून मित्राचाच खून

Next

तळेगाव दिघे : संगमनेर तालुक्यातील तिगाव येथील कनिष्ठ महाविद्यालयात बारावीत शिकणाऱ्या युवकाचा प्रेमप्रकरणातून मित्रानेच धारदार चाकूने भोसकून निर्घृण खून केला. तब्बल सहा दिवसानंतर (गुरुवारी) खांडगाव शिवारातील कपाळेश्वर डोंगराच्या मागे त्याचा मृतदेह आढळून आला. या खून प्रकरणी अल्पवयीन मित्राविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या घटनेने संगमनेर तालुक्यात खळबळ उडाली.
संगमनेर तालुक्यातील तिगाव येथील प्रमोद संजय वाघ (वय १७) हा संगमनेर श्रमिक कनिष्ठ महाविद्यालयाचा बारावीचा विद्यार्थी आहे. कॉजेलला चाललो, असे सांगून तो शनिवारी घराबाहेर पडला. मात्र तो घरी आलाच नाही. दोन-तीन दिवस त्याच्या कुटुंबीयांनी त्याचा शोध घेतला. मात्र तो सापडला नव्हता. अखेर भिकाजी कारभारी सांगळे (रा. तिगाव) यांनी फिर्याद दिली. या प्रकरणी संगमनेर पोलीस ठाण्याला अज्ञात व्यक्तीकडून अपहरण करण्यात आल्याचा गुन्हा दाखल केला होता. पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांनी तपासाकामी पोलीस पथक नेमले होते.
शनिवारी दुपारी एकच्या सुमारास आम्ही दोघे फिरण्यासाठी खांडगाव शिवारातील कपालेश्वर डोंगराकडे गेले होतो. त्याठिकाणी आमच्यात प्रेमप्रकरणातून जोरदार वादावादी झाली. त्यानंतर आपण चाकूने भोकसून प्रमोदचा खून केल्याचे आरोपीने पोलिसांना सांगितले.
पोलीस उपनिरीक्षक अश्विनी टिळे, हे. कॉ. परमेश्वर गायकवाड, पो. नाईक बाबा खेडकर, लुमा भांगरे यांच्या पथकाने आरोपीस घटनास्थळी नेले. खांडगाव शिवारातील डोंगराच्या पाठीमागे प्रमोद वाघ याचा मृतदेह पोलिसांना आढळून आला. पोलिसांनी पंचनामा करीत मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी संगमनेर येथे हलविला. गुन्ह्यात वापरलेला चाकूही पोलिसांनी जप्त केला.
याप्रकरणी अल्पवयीन मित्राविरुद्ध संगमनेर तालुका पोलीस स्टेशनला खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अल्पवयीन आरोपीस बाल न्यायालयासमोर हजर केले जाईल, असे पोलिसांनी सांगितले. पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अश्विनी टिळे अधिक तपास करीत आहे. या घटनेने संगमनेर तालुक्यात खळबळ उडाली आहे.
कॉल डिटेल्सवरून छडा...
च्पोलिसांनी मोबाईल कॉल डिटेल्सच्या आधारे शोध घेतला. प्रेम प्रकरणातून हा प्रकार घडल्याची कुणकुण पोलिसांना लागली. पोलिसांनी कॉल डिटेल्सच्या आधारे एका अल्पवयीन मित्रास ताब्यात घेत पोलिसी हिसका दाखवला असता त्याने खुनाची कबुली दिली.

Web Title: Mitra's murder from love affair

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.