मांडओहळ धरण ओव्हरफ्लो !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2017 08:47 PM2017-09-21T20:47:53+5:302017-09-21T20:48:57+5:30

Mandohal dam overflow! | मांडओहळ धरण ओव्हरफ्लो !

मांडओहळ धरण ओव्हरफ्लो !

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
टाकळी ढोकेश्वर : पारनेर तालुक्याला वरदान ठरलेले मांडओहळ धरण बुधवारी ओव्हर फ्लो झाले. धरण परिसर हिरवळीने नटल्याने पर्यटकांची गर्दी वाढली आहे.
या धरणाची साठवण क्षमता ३९९ दशलक्ष घनफूट आहे. धरणाच्या सांडव्यावरून गुरुवारी पहाटे पाणी बाहेर पडले आणि परिसरातून समाधान व्यक्त करण्यात आले. गेल्यावर्षी हे धरण जुलै महिन्यात पूर्ण क्षमतेने भरले होते. यावर्षी दोन महिने उशिराने हे धरण भरले आहे. मंगळवारी धरणात ७५ टक्के पाणीसाठा होता. एका दिवसात धरणात २५ टक्के वाढ होऊन धरण ओव्हरफ्लो झाले.
धरण पाणलोट क्षेत्रातील शिंदेवाडी,पळसपूर,कातळवेढे, काळेवाडी, नंदूरपठार, सावरगाव, करंजुले हर्या परिसरात बुधवारी दुपारी बारापासून चांगला पाऊस झाल्याने धरणात मोठ्या प्रमाणात नवीन पाण्याची आवक चालू झाली. धरण भरल्यामुळे वर्षभर टाकळी ढोकेश्वर, कर्जुले हर्या, कातळवेढे व पठारावरील १६ गावांची कान्हूरपठारसह परिसरातील गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न पूर्णपणे मिटला आहे.
या धरणाचा सर्वाधिक फायदा धरणाच्या खालील खडकवाडी, कामठवाडी, सिक्री, मांडवे खुर्द व देसवडे या गावांना होणार आहे. कारण नदीमधील केटीवेअरला वर्षभर पाण्याचा प्रवाह राहणार असल्याने उन्हाळी पिकांना पाणी मिळू शकते.
 

Web Title: Mandohal dam overflow!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.