अहमदनगर शहरास पाणी पुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी देहरे गावाजवळ फुटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2018 01:30 PM2018-01-24T13:30:01+5:302018-01-24T13:30:17+5:30

अहमदनगर शहराला पाणी पुरवठा करणारी जुनी मुख्य जलवाहिनी देहरे गावाजवळील रेल्वे पुलाच्या भरावाजवळ फुटली आहे. त्यामुळे कामाच्या दुरुस्तीसाठी दोन दिवस लागणार असून, शहरातील पाणी पुरवठा बंद राहणार आहे.

The main water pipeline that supplies water to Ahmednagar city, exploded near Dere village | अहमदनगर शहरास पाणी पुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी देहरे गावाजवळ फुटली

अहमदनगर शहरास पाणी पुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी देहरे गावाजवळ फुटली

Next

अहमदनगर : शहराला पाणी पुरवठा करणारी जुनी मुख्य जलवाहिनी देहरे गावाजवळील रेल्वे पुलाच्या भरावाजवळ फुटली आहे. त्यामुळे कामाच्या दुरुस्तीसाठी दोन दिवस लागणार असून, शहरातील पाणी पुरवठा बंद राहणार आहे.
मुळा धरणातून नगर शहराला पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन नगर तालुक्यातील देहरे गावाजवळ नगर-मनमाड महामार्गाशेजारी रेल्वे पुलाच्या भरावाजवळ बुधवारी सकाळी ११.३० वाजण्याच्या सुमारास फुटली. त्यामुळे नगर शहराला करण्यात येणारा पाणी पुरवठा बंद करण्यात आला आहे. महापालिकेच्यावतीने दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. हे काम दोन दिवस सुरु राहण्याची शक्यता आहे. नागापूर, बोल्हेगाव, पाईपलाईन रोड, केडगाव उपनगरास त्यामुळे आज पाणी पुरवठा होणार नाही. गुरुवारी रात्री उशीराने कमी दाबाने पाणी सोडण्यात येणार आहे. त्यामुळे पाणी जपून वापरण्याचे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे. महापालिकेची जुनी जलवाहिनी देहरे गावाजवळ नेहमीच फुटत असते. तेथे वारंवार दुरुस्तीही होते. पुन्हा काही महिन्यात देहरे गावाजवळ जलवाहिनी फुटते. असे चक्र गेल्या अनेक वर्षांपासून सुरु आहे. 

Web Title: The main water pipeline that supplies water to Ahmednagar city, exploded near Dere village

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.