Lok Sabha Elecation 2019 : उमेदवारी देऊन डोक्यावरून टाकण्याची राष्ट्रवादीची चाल : बबनराव पाचपुते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2019 04:33 PM2019-03-27T16:33:27+5:302019-03-27T16:34:17+5:30

डॉ.सुजय विखे यांना राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळत होती. पण मीच त्यांना राष्ट्रवादीत जाण्यात रोखले. कारण उमेदवारी देऊन डोक्यावरून टाकण्याची चाल आपल्या लक्षात आली होती, असा गौप्यस्फोट माजी मंत्री व भाजप नेते बबनराव पाचपुते यांनी केली.

Lok Sabha Elecation 2019: NCP's move candidature: Babanrao Pachpute | Lok Sabha Elecation 2019 : उमेदवारी देऊन डोक्यावरून टाकण्याची राष्ट्रवादीची चाल : बबनराव पाचपुते

Lok Sabha Elecation 2019 : उमेदवारी देऊन डोक्यावरून टाकण्याची राष्ट्रवादीची चाल : बबनराव पाचपुते

googlenewsNext

श्रीगोंदा : डॉ.सुजय विखे यांना राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळत होती. पण मीच त्यांना राष्ट्रवादीत जाण्यात रोखले. कारण उमेदवारी देऊन डोक्यावरून टाकण्याची चाल आपल्या लक्षात आली होती, असा गौप्यस्फोट माजी मंत्री व भाजप नेते बबनराव पाचपुते यांनी केली.
भाजपाचे उमेदवार सुजय विखे यांच्या प्रचारार्थ श्रीगोंदा येथे आयोजित बैठकीत ते बोलत होते. पाचपुते यांच्या निवासस्थानी आयोजित केलेल्या बैठकीत विखे यांना मानणारे सर्व नेते कार्यकर्ते उपस्थित होते.
खासदार दिलीप गांधींनी मतदारसंघात चांगली केली पण सर्व्हेत डॉ. सुजय विखे यांचे नाव पुढे होत. सुजय विखेंना भाजपात घ्या आणि उमेदवारी द्या असे आपणच दोन महिन्यांपुर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सांगितले होते. विखेंना उमेदवारी मिळाली असली तरी खासदार दिलीप गांधी हेही लवकरच प्रचार यंत्रणेत सहभागी होतील, अशी माहिती माजी मंत्री बबनराव पाचपुते यांनी श्रीगोदा येथे आयोजित कार्यकर्त्यांच्या बैठकीत बोलताना दिली.
यावेळी लोकसभा निवडणुकी प्रमाणे विधानसभा निवडणुकीत पाचपुतेंना आमदार करण्यासाठी करू अशी ग्वाही विखे समर्थकांनी दिली
भगवानराव पाचपुते, अण्णासाहेब शेलार यांनी सकारात्मक भुमिका घेतली. आता सर्व जण एकत्र आले आहेत. एक जीवाने काम करू, असेही पाचपुते म्हणाले. यावेळी सदाआण्णा पाचपुते, दत्तात्रय पानसरे, तुकाराम दरेकर, पुरूषोत्तम लगड, विठ्ठलराव काकडे, संतोष लगड, अनिल पाचपुते, सुभाष डांगे, विक्रमसिंह पाचपुते, बाळासाहेब गिरमकर, गणपतराव काकडे, अनिल ठवाळ, बाळासाहेब नाहाटा, बाळासाहेब खेतमाळीस, मिलिंद दरेकर, राजेंद्र म्हस्के यांची भाषणे झाली.

दक्षिणेत काँग्रेस भुईसपाट होणार - अण्णासाहेब शेलार
मी पुर्वी बबनराव पाचपुते यांचा निष्ठावंत कार्यकर्ता होतो. आता विखेंचा निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून माझी नोंद आहे . यापुढे मी जिल्हा परिषद, विधानसभा निवडणुक लढणार नाही. त्यामुळे मी कुणाचा स्पर्धक राहिलो नाही. बाळासाहेब थोरात यांनी माझ्या जागेवर जिल्हाध्यक्ष म्हणून नागवडे यांना संधी दिली असती तर बर झाले असते. सध्या प्रचारक तेच, उद्घाटक व तेच प्रेक्षक अशी परिस्थिती थोरांताची झाली आहे. त्यामुळे आता दक्षिणेत काँग्रेस भुईसपाट होणार, अशी टीकाही शेलार यांनी केली.

तर शांत राहीलो असतो
अनुराधा नागवडे यांना राष्ट्रवादीने उमेदवारी दिली असती तर शांत राहावे लागले असते. परंतु आता विषय संपला आहे. नागवडे यांनी पवारांचा शब्द पाळला होता. पण नागवडे यांना दिलेला शब्द पवारांनी पाळला का असा चिमटा बबनराव पाचपुते यांनी काढला.




 

Web Title: Lok Sabha Elecation 2019: NCP's move candidature: Babanrao Pachpute

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.