कोपर्डी खटल्यातील आरोपींवर दोष सिद्ध, 21 तारखेला अंतिम निकाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2017 09:51 AM2017-11-18T09:51:34+5:302017-11-18T12:02:24+5:30

राज्यभर गाजलेल्या कोपर्डी येथील अल्पवयीन मुलीवरील अत्याचार व खून खटल्याची अंतिम सुनावणी नगर जिल्हा व सत्र न्यायालयात सुरु झाली आहे. आरोपींवरील दोष सिद्ध झाले आहेत.

Kopdi case: Court acquits accused in court The hearing starts in a short time | कोपर्डी खटल्यातील आरोपींवर दोष सिद्ध, 21 तारखेला अंतिम निकाल

कोपर्डी खटल्यातील आरोपींवर दोष सिद्ध, 21 तारखेला अंतिम निकाल

googlenewsNext
ठळक मुद्देनगर जिल्हा व सत्र न्यायालयात कोपर्डी येथील अल्पवयीन मुलीवरील अत्याचार व खून खटल्याची अंतिम सुनावणीतिन्ही आरोपींना पोलीस बंदोबस्तात न्यायालयात आणण्यात आले आहेसुनावणीच्या पार्श्वभूमीवर नगर शहर व कोपर्डीत मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहेनिकालाकडे संपुर्ण राज्याचं लक्ष

अहमदनगर : राज्यभर गाजलेल्या कोपर्डी येथील अल्पवयीन मुलीवरील अत्याचार व खून खटल्याची अंतिम सुनावणी नगर जिल्हा व सत्र न्यायालयात सुरु झाली आहे. आरोपींवरील दोष सिद्ध झाले आहेत. कोपर्डी खटल्याची अंतिम सुनावणी 21 तारखेला होणार आहे.  या घटनेतील तिन्ही आरोपींना पोलीस बंदोबस्तात न्यायालयात आणण्यात आले आहे.
कोपर्डी अत्याचार व खून प्रकरणात पोलिसांनी मुख्य आरोपी पप्पू ऊर्फ जितेंद्र बाबूलाल शिंदे (वय २९), संतोष गोरख भवाळ (२९) व नितीन गोपीनाथ भैलुमे (२८) यांना अटक करुन त्यांच्याविरोधात सबळ पुरावे मिळवून दोषारोप पत्र ठेवले होते. याची सुनावणी येथील जिल्हा व सत्र न्यायालयात जिल्हा सत्र न्यायाधीश सुवर्णा केवले यांच्या पीठापुढे झाली. आरोपी व सरकारी पक्षाने आपापल्या बाजू मांडल्या असून, साक्षीपुरावे तपासून आज आरोपींवरील दोष सिद्ध होण्यासाठी थोड्याच वेळात सुनावणी होणार आहे. या सुनावणीच्या पार्श्वभूमीवर नगर शहर व कोपर्डीत मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
न्यायालयातील बंदोबस्त पोलीस उपाधीक्षक अशोक थोरात तर कोपर्डी येथील बंदोबस्त श्रीरामपूरचे अपर पोलीस अधीक्षक रोहिदास पवार यांच्या नियंत्रणाखाली तैनात करण्यात आला आहे.
खटल्याचा निकाल ऐकण्यासाठी होणारी गर्दी लक्षात घेऊन न्यायालय व्यवस्थापनाने बाहेरील नागरिकांसाठी ध्वनिक्षेपकाची व्यवस्था केली आहे. हा निकाल ऐकण्यासाठी न्यायालयातही मोठी गर्दी होणार आहे. त्यामुळे न्यायालयासह नगर शहर व कोपर्डीत बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आले आहे. नगर शहरातील बंदोबस्त सहाय्यक पोलीस अधीक्षक अक्षय शिंदे यांच्या नियंत्रणाखाली आहे. अपर पोलीस अधीक्षक घनश्याम पाटील बंदोबस्तावर देखरेख करत आहेत.
बंदोबस्त अधिकारी व बीडीएस पथकाने न्यायालय परिसराची तपासणी केली असून, शनिवारी न्यायालयात प्रवेश करणा-या व्यक्ती व वाहनांची तपासणी करण्यात येत आहे. आरोपींवर न्यायालय परिसरात आधी तीन वेळा हल्ल्याचा प्रयत्न झाल्याने पोलीस प्रशासनाने विशेष खबरदारी घेतली आहे.

Web Title: Kopdi case: Court acquits accused in court The hearing starts in a short time

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.