केडगाव दुहेरी हत्याकांडाचे दोषारोपत्र दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 6, 2018 04:26 PM2018-07-06T16:26:24+5:302018-07-06T16:26:40+5:30

Kedgaon double murder case filed | केडगाव दुहेरी हत्याकांडाचे दोषारोपत्र दाखल

केडगाव दुहेरी हत्याकांडाचे दोषारोपत्र दाखल

Next

अहमदनगर : राज्यभर गाजलेल्या केडगावमधील शिवसेना कार्यकर्त्यांच्या हत्याकांडाच्या घटनेला आज ९० दिवस पूर्ण झाले. त्यामुळे सीीआयडीला या गुन्ह्याचे जिल्हा न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.
केडगाव येथे ७ एप्रिल रोजी शिवसेनेचे शहर उपप्रमुख संजय कोतकर व कार्यकर्ता वसंत ठुबे यांची संदीप गुंजाळ याने गोळ्या घालून हत्या केली़ या घटनेनंतर गुंजाळ स्वत:हून पोलिसांत हजर झाला़ मयत संजय यांचा मुलगा संग्राम कोतकर यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांनी आमदार संग्राम जगताप, आ़मदार अरुण जगताप, आमदार शिवाजी कर्डिले यांच्यासह ३० व सहा अनोळखी व्यक्तींवर गुन्हा दाखल केला आहे़ या घटनेच्या तपासासाठी विशेष पथकाची नियुक्ती करण्यात आली होती़ विशेष पथकाने फिर्यादीत नाव असलेले आठ, तर इतर दोन अशा दहा जणांना अटक केली. हत्याकांडातील मयतांच्या कुटुंबीयांनी मात्र तपासी यंत्रणेवर आक्षेप घेतल्याने हा तपास राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे (सीआयडी) देण्यात आला. सीआयडीचे (पुणे) पोलीस उपाधीक्षक अरुणकुमार सपकाळे हे हत्याकांडाचा तपास करत आहेत.

Web Title: Kedgaon double murder case filed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.