दोन्ही मतदारसंघात युतीच्या मतांत वाढ

By admin | Published: May 17, 2014 11:41 PM2014-05-17T23:41:57+5:302014-05-18T00:15:43+5:30

अहमदनगर : नुकत्याच जाहीर झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर जिल्ह्यातील दोन्ही मतदारसंघात सेना-भाजपाच्या मतांच्या टक्केवारीत मोठी वाढ झालेली आहे.

Increasing votes in both the constituencies | दोन्ही मतदारसंघात युतीच्या मतांत वाढ

दोन्ही मतदारसंघात युतीच्या मतांत वाढ

Next

अहमदनगर : नुकत्याच जाहीर झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर जिल्ह्यातील दोन्ही मतदारसंघात सेना-भाजपाच्या मतांच्या टक्केवारीत मोठी वाढ झालेली आहे. शिर्डीत मतदारसंघात तर शिवसेनाचा उमेदवार बदला गेला असतांना गत पंचवार्षिकच्या तुलनेत सेनेच्या लोकप्रियतेत तीन टक्क्यांनी वाढलेली आहे. नगर दक्षिण मतदारसंघात भाजप-राष्ट्रवादीत झालेल्या सरळ लढतीत भाजपच्या मताधिक्क १७ टक्क्यांची भरघोस वाढलेले आहे. राज्याच्या राजकारणात काँग्रेस-राष्ट्रवादीचा जिल्हा म्हणून नगरची ओळख आहे. जिल्ह्यातील १२ विधानसभा मतदारसंघापैकी सात मतदारसंघ आघाडीच्या ताब्यात. स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये काँग्रेस- राष्ट्रवादीची ताकद मोठी. या शिवाय उत्तर जिल्ह्यात तीन कॅबिनेट मंत्री असतांनाही लोकसभा निवडणुकीत दोन पंचवार्षिक पासून सेना मोठ्या फरकाने विजयी होत आहे. २००९ निवडणुकीत शिवसेनेच्या तिकाटावर भाऊसाहेब वाकचौरे ५४. २६ टक्के मिळवित आघाडी पुरस्कृत अपक्ष म्हणून निवडणुक रिंगणात असणारे रामदास आठवले यांचा पराभव केला होता. त्यावेळी त्यांना ३४.२५ टक्के मिळाली होती. यंदा वाकचौरे यांनी ऐन निवडणुकीच्या तोंडावर सेनेला जय महाराष्ट्र करत, काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यामुळे सेनेची मोठी अडचण झाली. मात्र, सदाशिव लोखंडे यांच्या रूपाने सेनेला उमेदवार मिळाला आणि त्यांनी सरळ लढतीत वाकचौरे (काँग्रेसचा) मोठ्या फरकाने पराभव केला. या निवडणुकीत सेनेला ५७ टक्के मते मिळाली तर २००९ पेक्षा काँग्रेस आघाडीच्या मताधिक्यात २ टक्क्यांनी घट होत त्यांना ३५ टक्क्यांवर समाधान मानावे लागले. नगर दक्षिणेत मात्र भाजपाने २००९ च्या तुलनेत आपल्या मताधिक्क्यात १७ टक्क्यांची भरघोष वाढ मिळविण्यात यश मिळविले आहे. गत पंचवार्षिकला तिरंगी लढत झाली होती. त्यावेळी भाजपचे उमेदवार दिलीप गांधी ३९. ६८ टक्के मिळाली होती. राष्ट्रवादीचे तत्कालीन उमेदवार शिवाजी कर्डिले यांना ३३.७४ टक्के मते मिळाली होती. तर अपक्ष उमेदवार राजीव राजळे यांना १९.४३ टक्के मिळाली होती. यंदा या मतदारसंघात भाजप विरूध्द राष्ट्रवादी अशी सरळ लढत झाली. दहा लाखांपुढे मतदानाचा आकडा गेल्याने वाढलेला मतदानाचा फायदा कोणाला होतो, याकडे याकडे सर्वांच लक्ष होते. मात्र, नरेंद्र मोदीचा लाटेचा फटका असा बसला की, गांधींना मिळालेल्या मतांचा आकडा ५७ टक्क्यापर्यंत पोहचला. गत निडणूकीच्या तुलनेत यंदा यात १७ टक्क्यांनी वाढ झाली. २००९ च्या तुलनेत तांत्रिकदृष्ट्या राष्ट्रवादीच्या मताधिक्यात सव्वा तीन टक्क्यांनी वाढ झाली असली तरी गतवेळे अपक्ष उमेदवार राजळे हे राष्ट्रवादीच्या चिन्हा वर उभे होते. ( प्रतिनिधी)

गांधींची घोडदौड

लोकसभा निवडणुकीत वाढलेले मतदान मिळविण्यात भाजपाला यश मिळाले. यामुळे गांधींना सहा लाख मतांचा आकडा ओलांडता आला. सोशल मीडियाशी २४ तास कनेक्ट असणारी तरूणाईने नरेंद्र मोदीसाठी भाजपाला मतदान केले. मतदारसंघातील शेवगाव- पाथर्डी वगळता प्रत्येक मतदारसंघात गांधींना ४० ते ६० टक्के मताधिक्य मिळाले.

Web Title: Increasing votes in both the constituencies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.