भाजपाच्या मंत्र्यांचा नगरमध्ये डेरा, प्रचार फेऱ्यांऐवजी घरोघरी भेटीगाठी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2018 05:09 AM2018-12-04T05:09:22+5:302018-12-04T05:09:50+5:30

महापालिका निवडणुकीचा प्रचार करण्यासाठी भाजपचे मंत्री नगरमध्ये तळ ठोकून आहेत.

House ministers instead of camps, public meetings | भाजपाच्या मंत्र्यांचा नगरमध्ये डेरा, प्रचार फेऱ्यांऐवजी घरोघरी भेटीगाठी

भाजपाच्या मंत्र्यांचा नगरमध्ये डेरा, प्रचार फेऱ्यांऐवजी घरोघरी भेटीगाठी

Next

अहमदनगर : महापालिका निवडणुकीचा प्रचार करण्यासाठी भाजपचे मंत्री नगरमध्ये तळ ठोकून आहेत. रविवारी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी चौक सभा घेतल्या, तर सोमवारी सहकारमंत्री सुभाष देशमुख, समाजकल्याण राज्यमंत्री दिलीप कांबळे चौकसभांद्वारे मतदारांना सत्ता देण्याचे आवाहन करीत आहेत. शिवसेनेचे उपनेते नितीन बानगुडे यांनीही सोमवारी चौक सभा घेतल्याने प्रचाराचे वातावरण चांगलेच तापले आहे.
महापालिकेसाठी ९ डिसेंबरला मतदान होत आहे. प्रचारासाठी शेवटचे चार दिवस राहिले आहेत. सर्वच पक्षाचे उमेदवार आता प्रचार फेºयांऐवजी घरोघरी मतदारांच्या भेटीगाठी घेत आहेत. भाजपच्या प्रचाराचा समारोप मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ७ डिसेंबरला होणार आहे.
शिवसेनाही पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना प्रचारासाठी आणणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, धनंजय मुंडे, जयंत पाटील यांच्या सभा होणार आहेत.
>१३१ संवेदनशील केंद्र
महापालिका निवडणुकीसाठी ३३७ मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यापैकी १३१ केंद्र संवेदनशील घोषित करण्यात आली आहेत. तर ४१ केंद्र अतिसंवेदनशील घोषित करण्यात आली आहेत. यामध्ये केडगाव, जुन्या शहरातील तोफखाना या भागाचा समावेश आहे.

Web Title: House ministers instead of camps, public meetings

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :BJPभाजपा