अहमदनगरमध्ये विजांच्या कडकडाटसह गारांचा पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2018 04:43 PM2018-04-11T16:43:37+5:302018-04-11T16:43:37+5:30

नगर शहरासह जिल्ह्याच्या विविध भागात गाराच्या पावसाला सुरुवात झाली आहे. अचानकपणे वादळी वा-यासह गाराच्या पावसाला सुरुवात झाल्याने शेतक-यांची धावपळ उडाली आहे.

Heavy rain along with heavy rains in Ahmednagar | अहमदनगरमध्ये विजांच्या कडकडाटसह गारांचा पाऊस

अहमदनगरमध्ये विजांच्या कडकडाटसह गारांचा पाऊस

Next
ठळक मुद्देशेतक-यांचे मोठे नुकसान झाले

अहमदनगर : नगर शहरासह जिल्ह्याच्या विविध भागात गाराच्या पावसाला सुरुवात झाली आहे. अचानकपणे वादळी वा-यासह गाराच्या पावसाला सुरुवात झाल्याने शेतक-यांची धावपळ उडाली आहे.
दुपारपासूनच ढगाळ वातावरण होते. चार वाजल्यापासून विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली. वादळी वा-यासोबत काही भागात गाराही पडल्या. एमआयडीसी परिसरात मोठ्या प्रमाणात गारा पडल्या. जिल्ह्यातील विविध भागात वादळी वा-यासह पावसाने अचानक हजेरी लावली. पावसामुळे फळपिक शेतक-यांना मोठ्या नुकसान सहन करावे लागणार आहे. गेल्या आठवड्यातही जिल्ह्याच्या काही भागात वादळी वा-यासह गारांचा पाऊस झाला होता. या पावसामुळेही शेतक-यांचे मोठे नुकसान झाले होते.

Web Title: Heavy rain along with heavy rains in Ahmednagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.