प्रवाशाची सोन्याची चैन चोरीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2019 06:36 PM2019-05-09T18:36:42+5:302019-05-09T18:37:28+5:30

बसमध्ये चढणाऱ्या वयोवृध्द प्रवाशाच्या गळ्यातील सोन्याची चैन चोरट्याने गर्दीचा फायदा घेवून चोरून नेली. ही घटना संगमनेर बसस्थानकात मंगळवारी संध्याकाळी पाचच्या सुमारास घडली.

The gold chain of the passenger is stolen | प्रवाशाची सोन्याची चैन चोरीस

प्रवाशाची सोन्याची चैन चोरीस

googlenewsNext

संगमनेर : बसमध्ये चढणाऱ्या वयोवृध्द प्रवाशाच्या गळ्यातील सोन्याची चैन चोरट्याने गर्दीचा फायदा घेवून चोरून नेली. ही घटना संगमनेर बसस्थानकात मंगळवारी संध्याकाळी पाचच्या सुमारास घडली. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गोपाल मोतीलाल भुतडा (वय ६७, रंगारगल्ली, संगमनेर) हे नाशिकला जाण्यासाठी संगमनेर बसस्थानकात बसची प्रतिक्षा करत होते. बस आल्यानंतर बसमध्ये चढत असताना चोरट्याने गर्दीचा फायदा घेत त्यांच्या गळ्यातील ६९ हजार रूपये किंमतीची अडीच तोळे वजनाची सोन्याची चैन चोरून नेली. या प्रकरणी भुतडा यांनी शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

 

Web Title: The gold chain of the passenger is stolen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.