माजी खासदार तुकाराम गडाख यांचे निधन

By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2022 09:09 AM2022-12-03T09:09:01+5:302022-12-03T09:33:31+5:30

Tukaram Gadakh : गडाख यांच्या पार्थिवावर पानसवाडीच्या (ता. नेवासा) अमरधाममध्ये दुपारी बारा वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

Former MP Tukaram Gadakh passed away | माजी खासदार तुकाराम गडाख यांचे निधन

माजी खासदार तुकाराम गडाख यांचे निधन

googlenewsNext

नेवासा (जि. अहमदनगर) :  अहमदनगर (दक्षिण) लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार, नेवासा विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार तुकाराम गडाख (वय ७२)  यांचे हृदयविकाराच्या झटक्याने पहाटे निधन झाले.

तुकाराम गडाख यांच्या पश्चात पत्नी, त्यांचे बंधू किसन गडाख (पेशवे), पाच बहिणी, एक मुलगा, दोन मुली, नातवंडे असा परिवार आहे. गडाख यांच्या पार्थिवावर पानसवाडीच्या (ता. नेवासा) अमरधाममध्ये दुपारी बारा वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

तुकाराम गडाख यांना गुरुवारी मध्यरात्री हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर त्यांना अहमदनगर येथील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.  मात्र त्यांची प्राणज्योत मालवली.

Web Title: Former MP Tukaram Gadakh passed away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.