जामखेड शहरात गोळीबार, दोघे जखमी, हल्लेखोर फरार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2018 13:18 IST2018-02-01T13:18:10+5:302018-02-01T13:18:33+5:30

आज दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास जामखेड - अहमदनगर रस्त्यावरील पंचायत समिती कार्यालयासमोरून चारचाकी वाहनातून जात असताना समोरुन आलेल्या हल्लेखोरांनी दोघांवर हल्ला करत गोळीबार केला.

Firing in Jamkhed town, two injured and kidnappers absconding | जामखेड शहरात गोळीबार, दोघे जखमी, हल्लेखोर फरार

जामखेड शहरात गोळीबार, दोघे जखमी, हल्लेखोर फरार

ठळक मुद्देलांकडी दांडक्याने वाहनाची मोडतोड


जामखेड : आज दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास जामखेड - अहमदनगर रस्त्यावरील पंचायत समिती कार्यालयासमोरून चारचाकी वाहनातून जात असताना समोरुन आलेल्या हल्लेखोरांनी दोघांवर हल्ला करत गोळीबार केला. यामध्ये सादीक पठाण( रा. माळवाडी. ता. पाटोदा. जि.बीड) व कय्युम शेख ( जामखेड) जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.


याबाबत अधिक माहिती अशी की, पठाण व शेख हे दोघे नगरच्या दिशेने चारचाकी वाहनातून चालले होते. पंचायत समिती कार्यालयासमोरून जात असताना दोघांवर हल्ला करण्यात आला. यावेळी पाच गोळ््या झाडण्यात आल्या. पठाण यास तीन तर शेख यास दोन गोळ््या लागल्या आहेत. तसेच पाठीमागच्या बाजूने लांकडी दांडक्याने वाहनाची मोडतोडही करण्यात आली आहे. हल्ल्यानंतर हल्लेखोर फरार झाले असून पोलीस शोध घेत आहेत.

Web Title: Firing in Jamkhed town, two injured and kidnappers absconding