शेतकरी संपाची ज्योत तेवत ठेवणार : पुणतांब्यातील आंदोलनाला दोन वर्षे पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2019 01:17 PM2019-06-02T13:17:09+5:302019-06-02T13:17:14+5:30

पुणतांबे (ता. राहाता) येथील शेतकरी संपाला शनिवारी दोन वर्षे पूर्ण झाली. यानिमित्ताने गावात शेतकरी पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आले.

Farmers will keep flame of the strike: Two years of full strike in Punatamban | शेतकरी संपाची ज्योत तेवत ठेवणार : पुणतांब्यातील आंदोलनाला दोन वर्षे पूर्ण

शेतकरी संपाची ज्योत तेवत ठेवणार : पुणतांब्यातील आंदोलनाला दोन वर्षे पूर्ण

Next

शिवाजी पवार
श्रीरामपूर : पुणतांबे (ता. राहाता) येथील शेतकरी संपाला शनिवारी दोन वर्षे पूर्ण झाली. यानिमित्ताने गावात शेतकरी पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आले. दुसरीकडे भारतीय किसान सभेने राज्यभर संपाचा वर्धापन दिन साजरा केला. या ऐतिहासिक घटनेची ज्योत कायमची तेवत ठेवून वेळप्रसंगी पुन्हा सरकारला घेरण्याची धग जिवंत ठेवण्याचा प्रयत्न आहे.
पुणतांबे येथे शनिवारी संपाचे प्रमुख धनंजय धोर्डे, सरपंच डॉ. धनंजय धनवटे, सुहास वहाडणे, संभाजी गमे, गणेश बनकर, रामकृष्ण डोखे, विजय धनवटे, सुधाकर जाधव यांनी गावातील शेतकरी पुतळ्याला हार घातला. दुसरीकडे संपाचा प्रमुख भाग राहिलेल्या कॉ. अजित नवले यांनीही अकोले येथे दुसरा वर्धापन साजरा केला.
स्वातंत्र्य प्राप्तीनंतर शेतकऱ्यांनी पुकारलेला हा पहिलाच संप होता. कामगार वर्गाप्रमाणे शेतकरीही संप करू शकतो ही भावना प्रत्यक्षात अवतरली गेली. पुणतांबे येथे १ जून २०१७ रोजी अनोखे आंदोलन करण्यात आले. सरकारविरोधात शेतकऱ्यांमध्ये असलेला रोष यातून दिसला. शेतकºयांनी स्वत:पुरते उत्पादन घ्यावे व बाजार समित्यांमध्ये मालाची विक्री करायची नाही, असे या आंदोलनाचे सूत्र होते.
स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करा, दुधाला ५० रुपये लिटर दर निश्चित करावा, संपूर्ण कर्जमाफी द्यावी, वीजबिल माफ करण्यात यावे आदी प्रमुख मागण्या करण्यात आल्या. दूध तसेच भाजीपाल्याची विक्री करायची नाही असा निर्धार यात करण्यात आला होता.
दोन वर्षानंतर या संपाचे फलित काय तसेच शेतकरी आंदोलनाला त्याने नेमकी काय दिशा दिली याबाबत ऊहापोह सध्या सुरू आहे. यानिमित्ताने संपातील काही
प्रमुख नेत्यांशी ‘लोकमत’ने संवाद साधला. कॉ. अजित नवले म्हणाले, पुणतांबे येथील शेतकरी संप तसेच दिल्लीचा किसान मार्च यामुळे जगण्यामरण्याचे नेहमीचे प्रश्न प्रथमच चव्हाट्यावर आले. शेतकरी हा मुद्दा केंद्रस्थानी आला.
राज्य सरकारने जी सुमारे २० हजार कोटी रुपयांची जी काही कर्जमाफी दिली ते याच संपाचे यश आहे. केंद्रातील मोदी सरकारने दिलेली कृषी सन्मान योजना, शेतमालाच्या हमी भावात केलेली वाढ ही मोठी उपलब्ध झाली. शेतकºयांचे प्रश्न राजकीय पक्षांच्या व निवडणुकीच्या अजेंड्यावर आणण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी संपाची आठवण जनतेत जिवंत ठेवण्याचा प्रयत्न आहे, असे कॉ. नवले म्हणाले.

आंदोलनाने सरकारला धडा शिकविला
संपाचे प्रमुख धनंजय धोर्डे यांनी राज्य सरकारशी त्यावेळी केलेली बोलणी चुकल्याचे मान्य केले. सरकारने आम्हाला भुलविले, चकवा दिला. मात्र आंदोलनाने सरकारला धडा शिकविला. मराठा, धनगर आरक्षण, विद्यार्थी मोर्चा यांत सर्वात परिणामकारक आंदोलन शेतकरी संपाच्या माध्यमातून झाल्याचे ते म्हणाले.

Web Title: Farmers will keep flame of the strike: Two years of full strike in Punatamban

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.