केंद्रप्रमुखांच्या प्रश्नी ‘सीईओं’शी चर्चा

By admin | Published: July 18, 2014 01:13 AM2014-07-18T01:13:55+5:302014-07-18T01:39:20+5:30

अहमदनगर शिक्षकांच्या पगाराची जबाबदारी मुख्याध्यापकांकडे सोपविण्यात यावी, आदी विषयांवर केंद्रप्रमुख संघटनेच्या पदधिकाऱ्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेश नवाल यांच्या सोबत चर्चा केली.

Discussion with the Chiefs of the Center 'CEOs | केंद्रप्रमुखांच्या प्रश्नी ‘सीईओं’शी चर्चा

केंद्रप्रमुखांच्या प्रश्नी ‘सीईओं’शी चर्चा

Next

अहमदनगर : केंद्रप्रमुखांचे वेतन, वाहनभत्ता, शिक्षकांचे पगार केंद्रप्रमुखांऐवजी शिक्षकांच्या पगाराची जबाबदारी मुख्याध्यापकांकडे सोपविण्यात यावी, आदी विषयांवर केंद्रप्रमुख संघटनेच्या पदधिकाऱ्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेश नवाल यांच्या सोबत चर्चा केली.
यात अभावीत केंद्रप्रमुखांना काही तालुक्यात पदोन्नतीची एक वेतनवाढ देण्यात आलेली नाही. ती तातडीने मिळावी, दोन महिन्यांचा थकीत वेतन भत्ता मिळावा, शिक्षकांचे पगार करण्याची जबाबदारी मुख्याध्यापकांची आहे. या बाबत शासनाने स्पष्ट सूचना दिलेल्या आहेत. त्याकडे अनेक तालुक्यात दुर्लक्ष झालेले आहे. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी प्राधान्य क्रमाने केंद्रप्रमुखांच्या मागण्या मान्य करण्याचे आश्वासन दिले.
बैठकीला अर्जुन साळवे, अशोक घाडगे भिवसेन भोर, तुकाराम कातोरे, कांता घावटे, मंगला महामुनी, अशोक घुले, पांडुरंग शिंदे, प्रविण बेलदार, संतोष ढगे, सुनील लोंढे उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: Discussion with the Chiefs of the Center 'CEOs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.