काष्टी येथील धनश्री पतसंस्था घोटाळा; गवळी दापत्यांचा अटकपूर्व जामीन न्यायालयाने फेटाळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2017 12:01 PM2017-11-27T12:01:30+5:302017-11-27T12:15:22+5:30

Dhanashree credit union scam; The court rejected the anticipatory bail application of Gavli Dapi | काष्टी येथील धनश्री पतसंस्था घोटाळा; गवळी दापत्यांचा अटकपूर्व जामीन न्यायालयाने फेटाळला

काष्टी येथील धनश्री पतसंस्था घोटाळा; गवळी दापत्यांचा अटकपूर्व जामीन न्यायालयाने फेटाळला

Next

श्रीगोंदा : काष्टी येथील धनश्री पतसंस्थेतील ३५ लाखाच्या घोटाळ्यातील मुख्य आरोपी रमेश गवळी व ज्योती गवळी या पती, पत्नीचा जामीन जिल्हा सत्र न्यायालयाने फेटाळला आहे. त्यामुळे गवळी दापत्यांना अटक करण्यासाठी पोलिसांनी हालचाली सुरू केल्या आहेत.
धनश्री पतसंस्थेच्या अध्यक्षा ज्योती गवळी, रमेश गवळी यांनी संगनमत करून आपणास ३४ लाख १६ हजारास गंडविले, अशी फिर्याद अंबादास राहिंज यांनी १ नोव्हेंबर रोजी श्रीगोदा पोलीस ठाण्यात दाखल केली होती. तेव्हापासून गवळी दाम्पत्य फरार होते. अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी त्यांनी जिल्हा सत्र न्यायालयात धाव घेतली होती. पण न्यायालयाने त्यांचा जामीन फेटाळला आहे.

टांकसाळे यांची होणार चौकशी

तत्कालीन सहाय्यक निबंधक मिलिंद टांकसाळे यांच्या दुर्लक्षामुळे धनश्री पतसंस्थेत आर्थिक घोटाळा झाला आहे. त्यांना चौकशीसाठी बोलविणार आहे. संचालक मंडळाचेही जबाब नोंदवून घेणार आहे, असे पोलीस निरीक्षक बाजीराव पोवार यांनी सांगितले.

Web Title: Dhanashree credit union scam; The court rejected the anticipatory bail application of Gavli Dapi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.