मिरी शिवारात वाहनाच्या धडकेत हरिण मृत्यूमुखी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2018 04:53 PM2018-01-29T16:53:58+5:302018-01-29T16:56:19+5:30

मिरी-पांढरीपूल रस्त्यावरील मिरी शिवारातील गालेवस्ती नजीक एका कारने जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात एका हरणाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना रविवारी दुपारी घडली.

Death of a dear vehicle accident in the Mari | मिरी शिवारात वाहनाच्या धडकेत हरिण मृत्यूमुखी

मिरी शिवारात वाहनाच्या धडकेत हरिण मृत्यूमुखी

googlenewsNext

मिरी : मिरी-पांढरीपूल रस्त्यावरील मिरी शिवारातील गालेवस्ती नजीक एका कारने जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात एका हरणाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना रविवारी दुपारी घडली.
मिरी-पांढरीपूल रस्त्यावर दुपारच्या भर उन्हात भरधाव वेगाने आलेल्या इन्होवा गाडीने रस्ता पार करीत असलेल्या एका हरिणाला जोरदार धडक दिल्यामुळे सदर हरणाचा जागीच मृत्यू झाला. सदर घटनेची माहिती रमेश घोरपडे व अक्षय गाले यांनी देताच वनपरिक्षेत्रपाल मेहबूब शेख यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा करून पुढील कार्यवाहीसाठी मृत हरिणाचा मृतदेह पाथर्डी येथे रवाना केला.
मिरी परिसरात हरिणांचे मोठ्या प्रमाणात वास्तव्य असून पूर्वी अस्तित्वात असलेल्या वनक्षेत्रात मोठ्या प्रमाणात वृक्षतोड झाल्याने हरणाचे कळप असे भटकंती करीत आहेत. त्यामुळे अशा घटना येथे नेहमीच घडत असतात. त्यामुळे परिसरातील हरणांची संख्या दिवसेंदिवस घटत चालली आहे.

Web Title: Death of a dear vehicle accident in the Mari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.