डोक्यात गोळी घालून तरुणाची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2017 03:39 PM2017-07-29T15:39:39+5:302017-07-29T15:43:13+5:30

daokayaata-gaolai-ghaalauuna-taraunaacai-atamahatayaa | डोक्यात गोळी घालून तरुणाची आत्महत्या

डोक्यात गोळी घालून तरुणाची आत्महत्या

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
टाकळी ढोकेश्वर, दि़ २९ - राहुरी तालुक्यातील राजन सुरेंद्र शेटे (वय ३२, रा. छत्रपतीनगर, ता.राहुरी) या तरुणाने स्वत:च डोक्यात गोळी मारुन घेऊन आत्महत्या केल्याची घटना नगर-कल्याण महामार्गावरील काळेवाडी (ता.पारनेर) शिवारात घडली़ ही घटना शुक्रवारी रात्री घडली़
राहुरी येथील राजन शेटे, अशोक शिवराम खेवरे (रा़ देसवंडी, ता.राहुरी), कैलास मारुती कुसकुडे (रा. वाबोरी), सचिन प्रकाश क्षीरसागर (रा़ जोगेश्वरी आखाडा, रा.राहुरी) हे चार जण विना क्रमांकाच्या कारमधून कल्याणकडे जात असताना काळेवाडी शिवारात लघुसंकेसाठी थांबले होते़ त्यावेळी शेटे याने स्वत:वर गोळी झाडून घेत आत्महत्या केली़ त्यानंतर उर्वरित तिघांनी कारमधून शेटे याला नगर येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले़ मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. मृताची सखोल चौकशी होण्यासाठी मृत देह शवविच्छेदनासाठी पुण्याला पाठविण्यात आला असून वैद्यकीय अहवालानंतर या घटनेचे खरे कारण समोर येणार आहे.
विशेष म्हणजे ही घटना घडल्यानंतर या तिघांनी टाकळी ढोकेश्वर पोलीस स्टेशनला कोणतीही खबर न देता शेटेला नगरला रुग्णालयात दाखल केले़ त्यानंतर ही बाब उजेडात आली़ पुढील तपास पारनेर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हनुमंतराव गाडे करत आहे.

Web Title: daokayaata-gaolai-ghaalauuna-taraunaacai-atamahatayaa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.