बालिकेवर अत्याचार करणा-या आरोपीवर दोष सिद्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2018 11:19 AM2018-08-04T11:19:31+5:302018-08-04T11:19:57+5:30

अवघ्या पावणेतीन वर्षाच्या बालिकेचे अपहरण करून तिच्यावर अनैसर्गिक अत्याचार करणाऱ्या आरोपीवर शुक्रवारी जिल्हा न्यायालत दोषा सिद्ध झाला.

The culprit accused in the case of the girl has been proved guilty | बालिकेवर अत्याचार करणा-या आरोपीवर दोष सिद्ध

बालिकेवर अत्याचार करणा-या आरोपीवर दोष सिद्ध

googlenewsNext

अहमदनगर : अवघ्या पावणेतीन वर्षाच्या बालिकेचे अपहरण करून तिच्यावर अनैसर्गिक अत्याचार करणाऱ्या आरोपीवर शुक्रवारी जिल्हा न्यायालत दोषा सिद्ध झाला. बाळू गंगाधर बर्डे (वय ३० रा. सोनगाव ता. राहुरी) असे आरोपीचे नाव असून, त्याला ७ आॅगस्ट रोजी शिक्षा सुनावण्यात येणार आहे.
शहरातील रेल्व उड्डाणपुलाखाली राहणा-या मजूर कुटुंबातील बालिकेचे आरोपी बाळू बर्डे याने ८ डिसेंबर २०१६ च्या रात्री अपहरण करून तिला केडगाव येथील औद्योगिक वसाहतीत आणले. या ठिकाणी त्याने बालिकेवर अनैसर्गिक शारीरिक अत्याचार केला. अत्याचारानंतर बालिकेला घटनास्थळी सोडून बर्डे फरार झाला. एका कामागाराने त्या बालिकेला पाहिले तेव्हा याबाबत कोतवाली पोलीसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी मुलीला ताब्यात घेऊन उपचारासाठी जिल्हा रूग्णालयात दाखल केले. याबाबत पोलीस कॉस्टेबल प्रभावती कोकाटे यांनी ९ डिसेंबर २०१६ रोजी फिर्याद दाखल केली होती. त्यानंतर पीडित बालिकेच्या आई-वडिलांचा शोध घेण्यात आला. अत्याचार करणारा आरोपी मात्र मागे काहीच पुरावा न ठेवता पसार झाला होता. कोतवाली पोलीस ठाण्याचे तत्कालीन सहाय्यक निरिक्षक संदीप पाटील यांनी तब्बल एक महिना तपास करून आरोपी बर्डे याला नगर येथून ताब्यात घेतले.
या बाबत पाटील यांनी २७ फेब्रुवारी २०१७ रोजी जिल्हा न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. सरकारी पक्षाच्यावतीने अ‍ॅड. अर्जुन पवार यांनी हा खटला लढविला. या खटल्यात एकूण १४ साक्षीदार तपासण्यात आले. खटल्याचे अंतीम टप्यातील कामकाज जिल्हा व सत्र न्यायाधीश अशोककुमार भिलारे यांच्या समोर चालले़ शुक्रवारी आरोपीला या गुन्ह्यात दोषी धरण्यात आले आहे. आता शिक्षेवर सरकारी पक्ष व आरोपीपक्षाच्यावतीने ७ आॅगस्ट रोजी युक्तीवाद होणार आहे.

निकालाकडे लक्ष
बालिकेवरील अत्याचाराचे प्रकरण नगर शहरासह जिल्ह्यात गाजले होते. त्यामुळे हा खटला संवेदनशील बनला होता. आता यामध्ये आरोपीला काय शिक्षा होते. याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

पीडितेवर झाल्या अनेक शस्त्रक्रिया
बाळू बर्डे याने पावणेतीन वर्षाच्या चिमुरडीवर अतिशय क्रूरपणे अत्याचार केला होता.या घटनेमुळे बालिका बेशुद्ध होऊन तिची प्रकृती चिंताजनक बनली होती.नगर येथून तिला उपचारासाठी पुणे येथील ससून रूग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे तिच्यावर अनेक शस्त्रक्रिया करण्यात आल्या. अडीच ते तीन महिन्यांच्या उपचारानंतर तिला प्रकृती ठिक झाली.

Web Title: The culprit accused in the case of the girl has been proved guilty

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.