शनि अमावस्येनिमित्त शनि दर्शनासाठी भाविकांची गर्दी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2019 04:41 PM2019-05-04T16:41:00+5:302019-05-04T16:42:52+5:30

देवस्थानतर्फे पार्किंग व्यवस्था,आरोग्य, प्रसाद, पिण्याचे पाणी, माहिती सुविधा, आदी सुविधा देण्यात येत आहे. भाविकांना उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून चौथ-याजवळ मंडप उभा केला होता. तसेच खाजगी जमिनीचा पार्किंगसाठी वापर करण्यात येत आहे.

The crowd of devotees for Shani Darshan on Saturn Amavasya | शनि अमावस्येनिमित्त शनि दर्शनासाठी भाविकांची गर्दी 

शनि अमावस्येनिमित्त शनि दर्शनासाठी भाविकांची गर्दी 

googlenewsNext

सोनई (अहमदनगर) : शनि अमावस्या निमित्त आज (शनिवार दि.4 मे 2019) असलेल्या शनि अमावस्या निमित्त हजारो भाविकांनी शनिदेवाचे दर्शन घेतले.आज आमवस्येला पहाटे 4:03 मि.  सुरुवात झाली असून रविवारी पहाटे 4:15 पर्यंत  दिवसभर अमावस्या असल्यामुळे  भाविकांची गर्दी राहणार आहे .आज शनिवारी पहाटे खासदार चंद्रकांत खैरे,शनिभक्त राकेश कुमार (ऑस्ट्रेलिया), सौरव बोरा (मुंबई )यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली.यावेळी आदर्श गावचे सरपंच पोपटराव पवार उपस्थित होते.

देवस्थानतर्फे पार्किंग व्यवस्था,आरोग्य ,प्रसाद, पिण्याचे पाणी ,माहिती सुविधा, आदी सुविधा देण्यात येत आहे. भाविकांना उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून चौथ-याजवळ मंडप उभा केला होता. तसेच खाजगी जमिनीचा पार्किंगसाठी वापर करण्यात येत आहे.
याशिवाय अपंग व जेष्ठ नागरिक यांच्या अल्पशा दरात   वाहन व्यवस्था करण्यात आली आहे. "सूर्यपुत्र शनिदेव महाराज कि जय",पवनपुत्र हनुमान कि जय या जयघोषाने मंदिर परिसर दुमदुमला होता.मंदिर परिसर आकर्षक सजावट करण्यात आली होती.शनैश्वर देवस्थानचे विश्वस्तांनी आलेल्या मान्यवरांचा शाल,श्रीफळ व शनी प्रतिमा देऊन सन्मान केला. 

रस्त्याच्या बाजूंना खेळणी दुकाने आदीमुळे रस्ते फुलले होते.मात्र  जास्त तापमान ,बाहेरील राज्यातील भाविकांची संख्या कमी असल्यामुळे नेहमीपेक्षा गर्दी कमी दिसत होती.  भाविकांनी  मोफत अन्नदानाचा लाभ घेताना दिसत होते.मंदिर परिसरात रक्तदान शिबीरात अनेक भाविकांनी रक्तदान केले. गर्दीवर सी.सी.टी.व्ही कॅमेरे लक्ष ठेवुन होते.  शेवगावचे उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जवळे यांच्या मार्गदर्शनाखाली मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

Web Title: The crowd of devotees for Shani Darshan on Saturn Amavasya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.