लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणारे जोडपे अकोल्यात मृतावस्थेत आढळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2017 12:58 PM2017-12-08T12:58:10+5:302017-12-08T12:59:57+5:30

अकोले शहरातील शिवाजीनगर भागात एक महिला व तिचा जोडीदार मृतावस्थेत आढळले. हे दोघेही लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते.

A couple living in the relationship are found dead in Akole | लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणारे जोडपे अकोल्यात मृतावस्थेत आढळले

लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणारे जोडपे अकोल्यात मृतावस्थेत आढळले

Next

अकोले : शहरातील शिवाजीनगर भागात एक महिला व तिचा जोडीदार मृतावस्थेत आढळले. हे दोघेही लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते.
अकोले तालुक्यातील रेडे येथील प्रकाश बंदावणे (वय ३२) व चित्रा रजपूत (वय २४) हे शहरातील शिवाजीनगर भागात प्रेमसंबंधातून एकत्र राहत होते. प्रकाश विवाहित होता. त्याला तीन मुले आहेत. तर संबंधित महिला घटस्फोटित होती. दोघांमध्ये गेल्या काही दिवसांपासून भांडणे होत होती. गुरुवारी रात्री घरात लहान मुलगी रडत असल्याचे शेजारच्यांच्या लक्षात आले. त्यांनी आवाज दिला. मात्र, प्रतिसाद मिळाला नाही़ त्यामुळे शेजा-यांनी घराचा दरवाजा तोडला. त्यावेळी प्रकाश व चित्रा हे दोघेही मृतवस्थेत आढळले. चित्रा हिचा गळा दाबून खून करून प्रकाश याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. या महिलेच्या वडिलांनी मुलीचा खून झाल्याचा संशय व्यक्त करीत पोलिसांकडे तक्रार केली आहे.
हा प्रकार गुरुवारी रात्री उशिरा उघडकीस आला. शुक्रवारी दुपारपर्यंत पोलिसांत गुन्ह्याची नोंद झाली नव्हती. शवविच्छेदन झाल्यावर गुन्हा नोंद करण्यात येईल, असे पोलीस सुत्रांनी सांगितले.

Web Title: A couple living in the relationship are found dead in Akole

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.