कलाकेंद्रातील १८२ कलावंतांची कोरोना चाचणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2021 04:18 AM2021-04-03T04:18:41+5:302021-04-03T04:18:41+5:30

जामखेड : शहरातील चार कलाकेंद्रांतील कलावंताची ग्रामीण रुग्णालयाच्या वतीने कला केंद्रात जाऊन कोरोना चाचणी करण्यात आली. यावेळी १८२ ...

Corona test of 182 artists in the art center | कलाकेंद्रातील १८२ कलावंतांची कोरोना चाचणी

कलाकेंद्रातील १८२ कलावंतांची कोरोना चाचणी

Next

जामखेड : शहरातील चार कलाकेंद्रांतील कलावंताची ग्रामीण रुग्णालयाच्या वतीने कला केंद्रात जाऊन कोरोना चाचणी करण्यात आली. यावेळी १८२ जणांचे नमुने घेण्यात आले. त्यातील अँटीजेन टेस्टमधील ७४ जण निगेटिव्ह आले, तर १०७ जणांचे नमुने तपासणीसाठी नगर येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत.

जामखेड शहरात पाच तर मोहा येथे चार कलाकेंद्र आहेत. या ठिकाणी कलावंतांची संख्या मोठी आहे. कलाकेंद्रात मोठ्या प्रमाणावर लोक येतात. कोरोनाचा फैलाव होऊ नये यासाठी तहसीलदार विशाल नाईकवाडे व मुख्याधिकारी मिनीनाथ दंडवते यांनी कोरोना तपासणीचा निर्णय घेतला व तसे पत्र ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजय वाघ यांना देण्यात आले. त्यानुसार डॉ. वाघ यांनी प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी श्याम जाधववर, मच्छिंद्र रणसिंग व नगरपरिषदेचे आजिनाथ गिते यांना पाठविले.

कोरोना तपासणी करणाऱ्या पथकाने शहरातील चार कला केंद्रांतील नृत्यांगना, सोंगाड्या, वाद्य वाजविणारे, कला केंद्रचालक यांची अँटीजेन व आरटीपीसीआर तपासणी केली. अँटीजेनमध्ये ७४ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले तर १०७ जणांचे आरटीपीसीआर अहवाल येणे बाकी आहे. यानंतर मोहा येथील पाच कला केंद्रांतील कलावंतांची कोरोना तपासणी करण्यात येणार आहे.

Web Title: Corona test of 182 artists in the art center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.