पारनेरमध्ये बंद, जवळेत रास्तारोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2018 11:58 AM2018-07-26T11:58:53+5:302018-07-26T11:59:43+5:30

मराठा आरक्षणासाठी पारनेर तालुक्यात आज बंद पाळण्यात येत असून जवळे येथील बसस्थानकासमोर निघोज- जवळे - शिरुर या मार्गावर रास्तारोको करत आंदोलन सुरू करण्यात आले. रस्त्यावर मोकळे टायर पेटविण्यात आले.

Closed in Parner, Javalat Rastaroko | पारनेरमध्ये बंद, जवळेत रास्तारोको

पारनेरमध्ये बंद, जवळेत रास्तारोको

Next

जवळे : मराठा आरक्षणासाठी पारनेर तालुक्यात आज बंद पाळण्यात येत असून जवळे येथील बसस्थानकासमोर निघोज- जवळे - शिरुर या मार्गावर रास्तारोको करत आंदोलन सुरू करण्यात आले. रस्त्यावर मोकळे टायर पेटविण्यात आले.
आंदोलकांनी केलेल्या आवाहनाला साथ देत जवळे गावातील शाळा, कॉलेज, सहकारी बँक, पतसंस्था, हॉटेल, किराणा दुकान बंद करण्यात आले. तसेच संपूर्ण दिवसभर गाव बंद ठेवण्याचा निर्णय घेतला गेला. आंदोलनाच्या ठिकाणी आंदोलकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या. आंदोलनात जवळे ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Web Title: Closed in Parner, Javalat Rastaroko

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.