नाताळची सुटी साई संस्थानाला पावली; तब्बल साडे अठरा कोटींचे दान

By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2019 06:38 PM2019-01-02T18:38:04+5:302019-01-02T18:40:10+5:30

डिसेंबरचा शेवटचा आठवडा, 22 डिसेंबर ते 1 जानेवारी दरम्यान मिळालेल्या देणग्यांची मोजदाद करण्यात आली.

Christmas holiday benificial for Sai Sansthan; Around 14.5 crore donation | नाताळची सुटी साई संस्थानाला पावली; तब्बल साडे अठरा कोटींचे दान

नाताळची सुटी साई संस्थानाला पावली; तब्बल साडे अठरा कोटींचे दान

googlenewsNext

शिर्डी : नाताळची सुटी आणि आठवड्याची सुटी लागून आल्याने शिर्डीमध्ये साईभक्तांची मोठी गर्दी झाली होती. यामुळे या कालावधीत साई संस्थानाला तब्बल 18 कोटींच्या देणग्या मिळाल्या आहेत. 


डिसेंबरचा शेवटचा आठवडा, 22 डिसेंबर ते 1 जानेवारी दरम्यान मिळालेल्या देणग्यांची मोजदाद करण्यात आली. यामध्ये दानपेटीमध्ये साडे आठ कोटी रुपये मिळाले असून साई भक्तांनी साडे सोळा किलो चांदी आणि 507 ग्रॅम वजनाचे सोने अर्पण केले आहे. याशिवाय ऑनलाईनच्या माध्यमातून 3 कोटी देणगी प्राप्त झाली आहे.


याशिवाय 3 कोटी 62 लाख रुपये ऑनलाइन आणि प्यारो मार्फत पाचशेच्या माध्यमातून मिळाले आहेत. दानपेटीमध्ये आलेल्या चलनामध्ये 19 देशांचे 64 लाख किंमतीचे परकीय चलन मिळाले आहे. गतवर्षी पेक्षा यंदा भाविकांची संख्या कमी होती. यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत देणगी 30 लाखांनी कमी आली आहे. 

Web Title: Christmas holiday benificial for Sai Sansthan; Around 14.5 crore donation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :shirdiशिर्डी