भंडारदऱ्यात काजव्यांची ‘चमचम’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2019 02:10 AM2019-06-03T02:10:11+5:302019-06-03T02:10:17+5:30

आठवडाभरात पावसाचे संकेत : १५ जूनपर्यंत पर्यटन हंगाम

'Chancham' of Kajav | भंडारदऱ्यात काजव्यांची ‘चमचम’

भंडारदऱ्यात काजव्यांची ‘चमचम’

googlenewsNext

भंडारदरा (जि. अहमदनगर) : अकोले तालुक्यातील भंडारदरा परिसरात दरवर्षी राज्यातील निसर्गप्रेमी पर्यटकांना भुरळ घालणारी काजव्यांची ‘चमचम’ सुरू झाली आहे. दोन दिवसांपासून काजवे चमकू लागल्याने आठवड्यात पावसाचे आगमनाचे संकेत मिळत आहेत.
भंडारदरा परिसरातील अभयारण्य म्हणजे निसर्ग व जैव विविधतेचा मोठा खजिना आहे. दरवर्षी अभयारण्यात वैशाख महिन्याच्या उत्तरार्धात म्हणजे २५ मे ते १५ जून या कालावधीत हे काजवे दिसतात. यंदा मात्र पावसाचे आगमन उशिरा असल्याने त्यांचे दर्शन दोन दिवसांपासून होत आहे.

कुमशेत, पांजरे, उडदावणे परिसरात सध्या ते कमी संख्येने दिसत असले तरी पुढील पाच सहा दिवसांत त्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ होईल. हे काजवे सादडा, हिरडा, बेहडा, बोंडारा या वृक्षावरच दिसतात. कारण त्यांची साल खडबडीत व काजव्यांच्या प्रजननासाठी पूरक असते. नर मादी एकमेकांना आकर्षित करतात. त्यांच्या शेपटीकडील भाग पाºयासारख्या द्रवाने चमकतो. हा द्रव फक्त महिनाभर त्यांच्या शरिरात तयार होतो. नंतर याच वृक्षात ते आपली अंडी व पिलांना जन्म देतात.

Web Title: 'Chancham' of Kajav

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.