अहमदनगर महापालिकेच्या महिला व बालकल्याण समितीच्या सभापतीपदी भाजपाच्या लता शेळके

By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2019 02:03 PM2019-03-04T14:03:49+5:302019-03-04T15:09:20+5:30

महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण समितीच्या सभापतीपदी केडगाव भागातून निवडून आलेल्या भाजपाच्या नगरसेविका लता शेळके यांची बिनविरोध निवड झाली.

BJP's Lata Shelke will be the chairperson of Ahmednagar Municipal Corporation's Women and Child Welfare Committee | अहमदनगर महापालिकेच्या महिला व बालकल्याण समितीच्या सभापतीपदी भाजपाच्या लता शेळके

अहमदनगर महापालिकेच्या महिला व बालकल्याण समितीच्या सभापतीपदी भाजपाच्या लता शेळके

Next
ठळक मुद्देमहानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण समितीच्या सभापतीपदी केडगाव भागातून निवडून आलेल्या भाजपाच्या नगरसेविका लता शेळके यांची बिनविरोध निवड झाली. उपसभापतीपदी शिवसेनेच्या सुवर्णा गेनप्पा यांचा एकमेव अर्ज दाखल केला होता. स्थायी समिती सभापतीपदाच्या निवडणुकीत शिवसेनेचा पराभव झाल्याने महिला व बालकल्याण समितीच्या सभापतीपदासाठी शिवसेनेने माघार घेतली.

अहमदनगर - महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण समितीच्या सभापतीपदी केडगाव भागातून निवडून आलेल्या भाजपाच्या नगरसेविका लता शेळके यांची बिनविरोध निवड झाली. उपसभापतीपदी शिवसेनेच्या सुवर्णा गेनप्पा यांचा एकमेव अर्ज दाखल केला होता. या एकमेव समितीमध्ये सेनेमागे पाठबळ नसल्याने भाजपा-शिवसेनेची युती पहायला मिळाली. या निमित्ताने केडगाव भागाला सभापतीपदाची प्रथमच संधी मिळाली.

महिला व बालकल्याण समितीच्या सभापतीपदासाठी भाजपाच्या लता शेळके यांनी तर शिवसेनेच्या पुष्पा बोरुडे यांनी अर्ज दाखल केला होता. मात्र बोरुडे यांनी अर्ज मागे घेतल्याने शेळके बिनविरोध निवडून आल्या. उपसभापतीपदासाठी सुवर्णा गेनप्पा यांचा एकमेव अर्ज होता. त्यामुळे त्यांचीबी निवड बिनविरोध घोषित करण्यात आली. त्यामुळे या समितीवर भाजप-शिवसेना यांची युती झाल्याचे दिसून आले आहे. स्थायी समिती सभापतीपदाच्या निवडणुकीत शिवसेनेचा पराभव झाल्याने महिला व बालकल्याण समितीच्या सभापतीपदासाठी शिवसेनेने माघार घेतली. अखेर राज्यात युती झाली असली तरी महापालिकेत मात्र युती पहायला मिळाली नाही. महापौर निवडणुकीमध्ये ठरलेल्या सूत्रानुसार पदे दिल्याचे भाजपाचे नेते सांगत आहेत. आगामी काळात युतीचा विचार होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Web Title: BJP's Lata Shelke will be the chairperson of Ahmednagar Municipal Corporation's Women and Child Welfare Committee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.