साई संस्थानची चिल्लर स्वीकारण्यास बँकांचा नकार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2019 03:56 AM2019-06-16T03:56:07+5:302019-06-16T06:30:13+5:30

साईभक्तांकडून दानात येणारी चिल्लर उदंड झाल्याने राष्ट्रीयीकृत बँकांनी शुक्रवारी साई संस्थानकडून चिल्लर स्वीकारण्यास नकार दिला. परिणामी संस्थानला दानाची मोजदाद रद्द करावी लागली.

Banks refuse to accept Sai Institute's Chillar | साई संस्थानची चिल्लर स्वीकारण्यास बँकांचा नकार

साई संस्थानची चिल्लर स्वीकारण्यास बँकांचा नकार

शिर्डी (जि. अहमदनगर) : साईभक्तांकडून दानात येणारी चिल्लर उदंड झाल्याने राष्ट्रीयीकृत बँकांनी शुक्रवारी साई संस्थानकडून चिल्लर स्वीकारण्यास नकार दिला. परिणामी संस्थानला दानाची मोजदाद रद्द करावी लागली.

साई संस्थान आठवड्यातून दोनदा साईंना येणाऱ्या दानाची मोजदाद करते. ही रक्कम राष्ट्रीयीकृत बँकांत जमा करण्यात येते. आठवड्याला चार, पाच कोटी रुपये दानात प्राप्त होतात. प्रत्येक मोजणीत 6 ते 7 लाख रुपयांची चिल्लर निघते. बँकांत रोटेशननुसार पैसे जमा करण्यात येतात. बँकांना नोटाबरोबर चिल्लर घेणे बंधनकारक असते. मात्र आता अनेक बँकांकडे चिल्लर ठेवायला जागा नाही. त्यामुळे बँकांनी शुक्रवारी चिल्लर घेण्यास नकार दिला. त्यामुळे संस्थानला दान पेटीतील पैशाची मोजदाद रद्द करावी लागली.

विविध राष्ट्रीयीकृत बँकांचे अध्यक्ष व आरबीआईच्या अध्यक्षांना पत्र पाठवले आहे. येत्या आठवडाभरात यातून नक्कीच मार्ग काढला जाईल. -दीपक मुगळीकर, मुख्य कार्यकारी अधिकारी, शिर्डी.

Web Title: Banks refuse to accept Sai Institute's Chillar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :shirdiशिर्डी