बेलापूर-नेवासा-परळी रेल्वे मार्गाला मंजुरीचे आश्वासन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2017 04:57 PM2017-08-11T16:57:23+5:302017-08-11T16:57:23+5:30

Assurances to be approved in Belapur-Nevasa-Parali railway route | बेलापूर-नेवासा-परळी रेल्वे मार्गाला मंजुरीचे आश्वासन

बेलापूर-नेवासा-परळी रेल्वे मार्गाला मंजुरीचे आश्वासन

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
कुकाणा : बेलापूर- परळी रेल्वे मार्गाच्या सर्व्हेचे काम प्रगतीपथावर असून फेब्रुवारी २०१८ पर्यंत सर्व्हे पूर्ण करुन बेलापूर- नेवासा- शेवगाव- गेवराई - बीड - परळी रेल्वे मार्गाला मंजुरी दिली जाईल, असे आश्वासन रेल्वे मंत्रालयाचे शासकीय अधिकारी विजय पिंगळे यांनी खासदार सदाशिव लोखंडे व शिष्टमंडळाला दिले.
खा. लोखंडे यांच्या अध्यक्षतेखाली बेलापूर- परळी रेल्वे प्रवासी सेवा संस्थेची बैठक दिल्ली येथे नुकतीच पार पडली. बैठकीस पिंपळे व अधिकारी उपस्थित होते. बेलापूर- परळी या मार्गाचा बेलापूर- नेवासा- शेवगाव- गेवराई - बीड - परळी असा सर्व्हे होणे अपेक्षित असताना तो शेवगावपासून पाथर्डी, राजुरी, रायमोह मार्गे बीड असा करण्यात आला. केलेला सर्व्हे चुकीचा असल्याने तसेच डोंगराळ भागातून जात असल्याने हा मार्ग न परवडणारा आहे, असा अहवाल रेल्वे बोर्डाकडे सादर करण्यात आला. सेवा संस्थेने याला हरकत घेऊन ४ जुलै रोजी सोलापूर विभागीय कार्यालयासमोर उपोषण केले होते. या संदर्भात खा.लोखंडे यांनीही बैठक आयोजित केली होती.
दरम्यान, त्यानंतर सदरची बैठक दिल्ली येथे रेल्वे भवन येथे घेण्यात आली. बैठकीत खा.लोखंडे सेवा संस्थेचे सचिव रितेश भंडारी, निसार सय्यद, यशवंत एरंडे, गणेश मोढवे, शिवाजी दिशागत आदी उपस्थित होते. बैठकीत पिंगळे यांनी फेब्रुवारीपूर्वी सर्व्हे पूर्ण करण्याचा प्रयत्न करू तसेच सर्व्हे पूर्ण होताच या मार्गाला मंजुरी देऊन तातडीने हा मार्ग पूर्ण करणार असल्याचे आश्वासन या शिष्टमंडळाला दिले. नगर जिल्ह्यात रेल्वेचे जाळे नसल्याची खंत पिंगळे यांनी व्यक्त केली.
रेल्वे मंत्र्यांच्या शिर्डी दौºयात माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनीही या मार्गाच्या मागणीचे निवेदन तसेच विभागीय रेल्वे अधिकारी, सोलापूर यांच्यावर कारवाईच्या मागणीचे निवेदन दिले.

Web Title: Assurances to be approved in Belapur-Nevasa-Parali railway route

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.