अण्णा हजारे यांचा उपोषणाचा आज दुसरा दिवस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2019 11:04 AM2019-01-31T11:04:18+5:302019-01-31T11:04:30+5:30

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या उपोषणाचा आजचा दुसरा दिवस आहे.

 Anna Hazare's fast today is the second day | अण्णा हजारे यांचा उपोषणाचा आज दुसरा दिवस

अण्णा हजारे यांचा उपोषणाचा आज दुसरा दिवस

Next

राळेगणसिद्धी : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या उपोषणाचा आजचा दुसरा दिवस आहे. लोकपाल, लोकायुक्त व शेतक-यांच्या प्रश्नासाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे काल राळेगणसिद्धी येथील संत यादवबाबा मंदिरात उपोषणाला बसले आहेत. अण्णांच्या उपोषणाचा आजचा दुसरा दिवस असून अद्याप सरकारकडून कोणतीही हालचाल झाली नाही.
आज राळेगणसिद्धीचे ग्रामस्थ व पारनेर तालुक्यातील सर्व नागरिक तहसिल कार्यालयावर मोर्चा काढून तहसीलदारांना निवेदन देणार आहेत. राळेगणसिद्धीमध्ये आज संपूर्ण दिवस गावकरी उपोषणाला बसणार असल्याचे माहिती उपसरपंच लाभेष औटी यांनी सांगितले.


 

Web Title:  Anna Hazare's fast today is the second day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.