अजित पवारांनी मागितली अण्णांची माफी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2019 13:27 IST2019-02-01T13:17:29+5:302019-02-01T13:27:55+5:30

‘अण्णा हजारे हे संघाचे एजंट आहेत’ असे वक्तव्य राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केले होते. अजित पवार यांनी आज नगरमध्ये या वक्तव्याबद्दल दिलगिरी व्यक्त करत अण्णांची माफी मागितली.

Ajay Pawar asks for Anna's apology | अजित पवारांनी मागितली अण्णांची माफी

अजित पवारांनी मागितली अण्णांची माफी

अहमदनगर : ‘अण्णा हजारे हे संघाचे एजंट आहेत’ असे वक्तव्य राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केले होते. अजित पवार यांनी आज नगरमध्ये या वक्तव्याबद्दल दिलगिरी व्यक्त करत अण्णांची माफी मागितली. अण्णांच्या आंदोलनाला पक्षाचा पाठिंबा असल्याचे ते म्हणाले.
परिवर्तन यात्रेसाठी पवार आज नगरमध्ये आले होते, त्यावेळी पत्रकारांनी त्यांचे मलिक यांच्या वक्तव्याकडे लक्ष वेधले असता, पवार यांनी दिलगिरी व्यक्त केली. अण्णा हजारे यांनी आमच्या सत्ताकाळातही आंदोलने केली. त्यावेळी आम्ही वेळोवेळी आंदोलनाची दखल घेतली. त्यामुळे आंदोलन ताणले नाही. परंतु हे सरकार अजूनही अण्णांच्या आंदोलनाकडे फिरकले नाही. भाजपचे मंत्री महाजन यांना आंदोलनस्थळी येण्यास अण्णांनी नकार दिला. त्यामुळे आता थेट मुख्यमंत्रीच अण्णांना भेटायला येणार असल्याची माहिती आपल्या कानावर आली असल्याचेही पवार म्हणाले.
 

Web Title: Ajay Pawar asks for Anna's apology