बेकायदा वाळू उपसणारी ७ वाहने पकडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2019 11:14 AM2019-01-31T11:14:36+5:302019-01-31T11:16:26+5:30

सिद्धटेक (ता. कर्जत) येथे भीमानदी पात्रात अवैधरीत्या वाळू उपसा करून वाहतूक करणारी ७ ट्रक जामखेडचे तहसीलदार विशाल नाईकवडे यांच्या पथकाने पकडली.

 7 vehicles seized by illegal sand | बेकायदा वाळू उपसणारी ७ वाहने पकडली

बेकायदा वाळू उपसणारी ७ वाहने पकडली

Next

कर्जत : सिद्धटेक (ता. कर्जत) येथे भीमानदी पात्रात अवैधरीत्या वाळू उपसा करून वाहतूक करणारी ७ ट्रक जामखेडचे तहसीलदार विशाल नाईकवडे यांच्या पथकाने पकडली. ही वाहने कर्जतच्या प्रांताधिकारी कार्यालयात जमा करण्यात आली आहेत.
मंगळवारी २९ जानेवारीच्या मध्यरात्री अवैधरित्या वाळू उपसा सुरू असल्याची गुप्त माहिती जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांना समजली. त्यांनी तहसीलदार नाईकवडे यांना कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार नाईकवडे यांनी मंगळवारी मध्यरात्री तत्काळ जामखेडचे तलाठी व कर्मचाऱ्यांचे पथक तयार करून खासगी वाहनाने सिद्धटेक भीमानदी पात्र गाठले. नाईकवडे यांच्या पथकाने भीमानदी पात्रातून अवैधरित्या वाळू उपसा करणारी ७ मोठी वाहने पकडली. या कारवाईमध्ये जामखेड व कर्जतचे तलाठी सहभागी झाले होते.

Web Title:  7 vehicles seized by illegal sand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.