निळवंडे धरणातून ११ हजार २७४ क्यूसेक पाण्याचा विसर्ग, प्रवरा नदीला पूर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2018 12:59 PM2018-08-22T12:59:21+5:302018-08-22T13:22:17+5:30

निळवंडे धरणातून मंगळवारी ११ हजार २७४ क्यूसेकने पाणी सोडण्यात आल्यामुळे प्रवरेच्या पाणीपातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.

11 thousand 274 cusecs of water from the Nilvande dam | निळवंडे धरणातून ११ हजार २७४ क्यूसेक पाण्याचा विसर्ग, प्रवरा नदीला पूर

निळवंडे धरणातून ११ हजार २७४ क्यूसेक पाण्याचा विसर्ग, प्रवरा नदीला पूर

Next

राजूर(जि. अहमदनगर) : निळवंडे धरणातून मंगळवारी (21 ऑगस्ट) रात्री नऊ वाजता ११ हजार २७४ क्यूसेकने पाणी सोडण्यात आल्यामुळे प्रवरेच्या पाणीपातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. प्रवरेला पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मंगळवारी दिवसभर पावसाचे सातत्य टिकून होते. भंडारदरा धरणात नवीन पाण्याची आवक वाढत असल्याने या धरणातील पाणी पातळी कायम ठेवण्यासाठी धरणातून सायंकाळी सहा वाजता ५ हजार ५४३ क्यूसेकने पाणी सोडण्यात आले. 

निळवंडे धरणातील पाणी पातळीतही सोडण्यात आलेल्या या पाण्यामुळे वाढ झाली. ही पाणी पातळी कायम ठेवण्यासाठी निळवंडे धरणातून रात्री नऊ वाजता ११ हजार २७४ क्यूसेकने पाणी प्रवरा पात्रात सोडण्यास सुरुवात झाली. या पाण्यामुळे प्रवरा नदीच्या पाणी पातळीतील वाढ झाली असून प्रवरेला या मोसमात पहिल्यांदाच पूर आला आहे. जलसंपदा विभागाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
 

Web Title: 11 thousand 274 cusecs of water from the Nilvande dam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.