todays panchang importance day 16 april 2019 | Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग मंगळवार, 16 एप्रिल 2019
Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग मंगळवार, 16 एप्रिल 2019

सिंह राशीत जन्मलेली आजची मुलं चंद्र-शनि नवपंचम योगामुळे अनेक प्रांतात प्रभाव निर्माण करतील. शिक्षणात यश मिळेल. उद्योगात प्रगती कराल. समाजाशी संपर्क राहील. यांत्रिक क्षेत्राशी संपर्क राहील. यांत्रिक क्षेत्राशी संपर्क येतो. 

सिंह राशी म, ट अद्याक्षर.   

(अरविंद पंचाक्षरी यांच्याकडून)

आजचे पंचांग 

मंगळवार, दि. 16 एप्रिल 2019
भारतीय सौर 25 चैत्र 1941

मिती चैत्र शुद्ध दशमी 07 क. 08 मि.
मघा नक्षत्र 28 क. 1 मि., सिह चंद्र
सूर्योदय 06 क. 23 मि., सूर्यास्त 06 क. 55 मि.

कामदा स्मार्त एकादशी

दिनविशेष

1853 - भारताची पहिली रेल्वे मुंबई ते ठाणे या लोहमार्गावर धावली. 

1889 - पाश्चिमात्य चित्रपटसृष्टीतील जागतिक ख्यातीचा विनोदी नट चार्लस् स्पेन्सर तथा चार्ली चॅप्लिन यांचा जन्म. 

1938 - समर्थ वाड्मयाचे अभ्यासक व समर्थ चरित्रकार सदशिव खंडो आळतेकर यांचे निधन. 

1957 - शाहीर अमर शेख यांच्या कन्या व प्रसिद्ध कवयित्री मल्लिका अमर शेख यांचा जन्म. 

1978 - हिंदी चित्रपटसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री तथा मॉडेल लारा दत्ता हिचा जन्म. 

2000 - ज्येष्ठ कृषितज्ञ पद्मश्री दिनकर गोविंदराव तथा आप्पासाहेब पवार यांचे निधन. 

 


Web Title: todays panchang importance day 16 april 2019
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.