संतांचा सहवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2019 05:03 AM2019-03-09T05:03:50+5:302019-03-09T05:03:52+5:30

शूचीसंपन्न श्रीमंत घराण्यात जन्म हा फक्त योगभ्रष्ट पुण्यवान महापुरुषांनाच लाभतो, असे भगवंत आपल्या परमभक्ताला, म्हणजेच भक्तश्रेष्ठ अर्जुनाला मोठ्या प्रेमाने सांगतात.

Saints coitus | संतांचा सहवास

संतांचा सहवास

Next

- वामनराव देशपांडे
शूचीसंपन्न श्रीमंत घराण्यात जन्म हा फक्त योगभ्रष्ट पुण्यवान महापुरुषांनाच लाभतो, असे भगवंत आपल्या परमभक्ताला, म्हणजेच भक्तश्रेष्ठ अर्जुनाला मोठ्या प्रेमाने सांगतात. कारण अर्जुन हा श्रेष्ठ साधक आहे. भोगविरहित आयुष्य जगणारा, प्रत्यक्ष भगवंतांच्या कृपाशीर्वादाला प्राप्त झालेला अर्जुन म्हणजे तर परमभक्तीचे परमोच्च शिखर होता. विवेक आणि वैराग्याचे मूर्त रूप होता. अर्जुनाची अनेक जन्मांची साधना होती, म्हणून स्वत: भगवंत आपल्या या अत्यंत श्रेष्ठ परमभक्ताचे संरक्षण कवच झाला होता. म्हणून भगवंत त्याला ज्ञानमयी योगभ्रष्ट महाभक्ताच्या मृत्यूनंतर तो योगभ्रष्ट आपली अपुरी राहिलेली साधना पूर्ण करून, कुठल्या महान कुळात अखेरचा जन्म घेऊन मोक्षपदावर आरूढ होतो, ते सांगतात,
अथवा योगिनामेव कुले भवति धीमताम।
एतद्धि दुर्लभतरं लोके जन्म यदीद्दशम।।
पार्था, हा जो योगभ्रष्ट असतो ना, तो अत्यंत वैराग्यसंपन्न, ज्ञानी ऋषीच्या कुळातच आपला अखेरचा जन्म घेऊन आपली अपुरी साधना पुर्ण करतो आणि परमेश्वराची प्राप्ती करून घेतो असा हा योगीकुळात जन्म होणे ही मानवी आयुष्यातली अत्यंत दुर्मीळ घटना आहे. पार्था, असा जन्म जो लाभतो, तो नि:संशयपणे दुर्लभ असतो. ही योगभ्रष्टांची गती तू समजून घे. मानवी देह प्राप्त होणे हीच एक दुर्लक्ष गोष्ट आहे. या मानवी जन्मात आपण स्वत: अथक साधनेच्या बळावर मोक्षाची प्राप्ती करून घ्यावी, अशी इच्छा बाळगणारी माणसे अत्यल्पच असतात. त्याचप्रमाणे, संतपुरुषांचा सहवास लाभणे हेसुद्धा अतिशय दुर्लभ आहे.

Web Title: Saints coitus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.