आनंद तरंग : श्रद्धेय साधक

By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2019 03:09 AM2019-06-08T03:09:36+5:302019-06-08T03:09:45+5:30

माझ्या अस्तित्वाचा विसर पडलेली ही दुर्दैवी माणसे मला प्राप्त करून न घेता, जन्म-मृत्यूच्या चक्रावर फिरत राहतात. वेगवेगळ्या योनीत प्रवेश करीत जगत मरत राहतात.

Happiness wave: revered seekers | आनंद तरंग : श्रद्धेय साधक

आनंद तरंग : श्रद्धेय साधक

Next

वामनराव देशपांडे

भगवंतांनी भक्तश्रेष्ठ अर्जुनाला प्रत्यक्ष युद्धभूमीवर आंतरिक मन:शांतीची दर्शनवाट दाखवली. माणसापाशी परमेश्वराविषयी अतुट श्रद्धा, दृढविश्वास हवा. ज्ञानभारला विवेक हवा. वैराग्याचे वरदान लाभायला हवे. परमेश्वर जरी मर्त्य दृष्टीचा विषय नसला तरी परमेश्वरी तत्त्व सत्य आहे आणि त्यानेच निर्माण केलेले हे मायावी विश्व, जे आपण दृष्टीने प्रत्यक्ष अनुभवतो, ते असत्य आहे. भगवंतांनी स्पष्ट शब्दांत सांगितले आहे की,
अश्रद्धाना: पुरुषा धर्मस्यास्य परन्तप।
अप्राप्य मां निवर्तन्ते मृत्युसंसाखत्मनि।।
पार्था, तू दोषदृष्टीरहित आहेस म्हणून तुला प्रेमाने अंत:करणातले गुह्यतत्त्व सांगायला सतत उत्सुक असतो. तुझे अशुभापासून रक्षण करणारे, तुला मुक्ती अर्पण करणारे हे गोपनीय ज्ञान ध्यानपूर्वक श्रवण कर. जे या विश्वात देहभावनेने जगत आहेत, ते दुर्दैवी जीव या सहजसोप्या तत्त्वाचे श्रवणच करीत नाहीत. कारण ती माणसे मूलत: अश्रद्धेय वृत्तीची असतात. या मर्त्य दृश्य विश्वावर श्रद्धेय अंत:करणाने आंधळा विश्वास ठेवणारी, माझ्या अस्तित्वाचा विसर पडलेली ही दुर्दैवी माणसे मला प्राप्त करून न घेता, जन्म-मृत्यूच्या चक्रावर फिरत राहतात. वेगवेगळ्या योनीत प्रवेश करीत जगत मरत राहतात.
भगवंतांनी अर्जुनाला श्रद्धेय साधकांची मनोवृत्ती सांगताना महत्त्वाचा विचार दिला की, परमेश्वराविषयी अतुट श्रद्धा, त्याच्या अस्तित्वाविषयी दृढविश्वास आणि ज्ञानभारला विवेक याची साधकाला नितांत आवश्यकता आहे. हे गुण त्याच्यापाशी नसतील तर तो नामसाधनेला आणि शुद्ध ज्ञानाच्या प्राप्तीला अपात्र ठरतो. विवेकहीन माणसाला भगवंत अस्तित्वसुद्धा जाणवत नाही, तर भगवंताची प्राप्ती कशी काय होणार?

Web Title: Happiness wave: revered seekers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.