शरीर ही माया

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2019 02:31 AM2019-02-13T02:31:36+5:302019-02-13T02:31:59+5:30

आपल्यापैकी थोड्यांनाच पटेल ही निसर्गातील दोन सत्यभौतिक व अतींद्रिय ही एकमेकांशी जुळणारी व मिसळणारी आहेत. परंतु भौतिक जग हे आपल्या पाच कर्मेंद्रियाशी निगडित असते व जागृतावस्थेत असते तर अतींद्रिय जग हे अंधूक अशा चेतनेशी निगडित असून तर्कशास्त्र व वादविवाद यांच्यापलीकडे असते.

 The body itself is Maya | शरीर ही माया

शरीर ही माया

googlenewsNext

- डॉ. मेहरा श्रीखंडे

आपल्यापैकी थोड्यांनाच पटेल ही निसर्गातील दोन सत्यभौतिक व अतींद्रिय ही एकमेकांशी जुळणारी व मिसळणारी आहेत. परंतु भौतिक जग हे आपल्या पाच कर्मेंद्रियाशी निगडित असते व जागृतावस्थेत असते तर अतींद्रिय जग हे अंधूक अशा चेतनेशी निगडित असून तर्कशास्त्र व वादविवाद यांच्यापलीकडे असते. भौतिकशास्त्र व अतींद्रियशास्त्र यामधील फरक हा जडत्व व भूत, मर्यादित व अमर्यादित, मानव व ईश्वर यांच्यातील फरकासारखा आहे. आपण त्याला अधिक सखोलपणे समजून घेणे अत्यंत गरजेचे आहे. आपले भौतिक शरीर ही एक माया आहे. या मायेच्या शरीराखाली जीवनाचे मूळ जो प्राण आहे तो आहे. प्राण हा विश्वाचा व सर्वव्यापक ऊर्जेचा जी सर्व प्राणिमात्रांत वास्तव्यास आहे, त्याचाच एक भाग आहे, हे ध्यानात घेतले पाहिजे. आपण एकटे नाही, हे आपण जाणून घेतले पाहिजे. या विश्वाचाच आपण एक भाग आहोत. निर्माण करणाऱ्याने जे निर्माण केले त्यात व आपणात एक प्रकारची एकवाक्यता आहे. आपण आपल्याला घडवू शकतो व आपल्या अंधूक जाणिवांची उत्क्रांती घडवून आणू शकतो. प्रत्येक मानवाला त्याच्या स्वत:च्या प्रयत्नाने विश्वाशी जोडण्याची प्रक्रिया निर्माण करायची असते. सूफी संत शेख लीवेलीन व्हॉगन ली गालातल्या गालात हसत म्हणाले, दैवी दृष्टिकोनातून काळाचे काहीच महत्त्व नाही. काळ हा पृथ्वीतलावर असतो कारण त्याला त्याचे असे एक कारण असते. आपला आत्मा, स्मृती व गतजन्माच्या आठवणी जवळ बाळगतो व आपण ठरावीक क्षणी त्या जीवनाच्या काळात जाऊ शकतो. हे करत असताना दुसºयाला बघणारे ते आपण स्वत:लाही बघत असतो.

Web Title:  The body itself is Maya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.