आनंद तरंग : साजे या विठ्ठला

By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2019 04:15 AM2019-06-06T04:15:12+5:302019-06-06T04:15:28+5:30

एकात परमेश्वर आहे, दुसऱ्यात नाही, हे कोण आणि कसे सांगणार... तो दूर आहे, तो जवळही आहे,’ ईशोपनिषदात हे अत्यंत सुंदर रीतीने सांगितले आहे.

Anand Tarang: Saaje Vitthala | आनंद तरंग : साजे या विठ्ठला

आनंद तरंग : साजे या विठ्ठला

Next

शैलजा शेवडे

तुका म्हणे जे जे बोला ते ते साजे या विठ्ठला
या परब्रह्माला विठ्ठल म्हणा, याला राम म्हणा, गणपती म्हणा, कृष्ण म्हणा... तुम्ही तुम्हाला पाहिजे ते नाव देऊ शकता....ते परब्रह्म आहे तरी कसे..भगवद्गीतेत श्रीकृष्ण म्हणतात, ‘जगात दृष्टीस पडणाऱ्या सर्व वस्तू किंवा गुण माझीच रूपे आहेत. म्हणजे प्रतीके आहेत. तर त्यापैकी एकात परमेश्वर आहे, दुसऱ्यात नाही, हे कोण आणि कसे सांगणार... तो दूर आहे, तो जवळही आहे,’ ईशोपनिषदात हे अत्यंत सुंदर रीतीने सांगितले आहे.
अनैजदेकं मनसो जवीयो नैनद्देवा आप्रुवन्पूर्वमर्षत
तद्भावतोऽन्यानत्येति तिष्ठत। तस्मिन्नपो मातरिश्वा दधाति, अचल एक ते चपळ मनाहून, अप्राप्य इंद्रिया आधीच निघाले, मागे टाकी गतिमानांना, ईशतत्त्व ते एक अविचल, मनाहूनही तरी असे अचपळ पकडू न शकती इंद्रिये त्याजला, तदेजति तन्निजति तद्दूरे दद्वन्तिके। तदन्तरस्य सर्वस्य तदु सर्वस्य बाह्यत: ॥५॥ ते चल, ते अचल, ते दूर, ते अत्यंत जवळही, ते सर्वांच्या आतही, ते सर्वांच्या बाहेरही असे कसे ते तत्त्व असे, अचल आणखी चलही असे, गती देतसे विश्वा साºया, तरीही कसे ते स्थिरही असे ते दूर दूरही, ते अत्यंत जवळी असे,
सपर्यगाच्छुक्रमकायमव्रणं अस्नाविरँ शुद्धमपापविद्धम।
कविर्मनीषी परिभू: स्वयंभूयार्थातत्थ्यतोऽर्थान्
व्यदधाच्छाश्वतीभ्य: समाभ्य: ॥८॥
तो सर्वगत, तेजोमय, अशरीरी निष्कलंक,
स्नायुरहित निष्पाप शुद्ध, सर्वसाक्षी अनंत,
सर्वव्यापी, स्वयंभू, असे जो, नेमून दिली त्यानेच कामे,
वैश्विक शक्तींना अनादी काळापासून ॥९॥
ते असेही आहे, ते तसेही आहे... त्या परब्रह्माचे आपण काय वर्णन करणार...!

Web Title: Anand Tarang: Saaje Vitthala

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.