लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्हा परिषद शिक्षकांच्या प्रलंबित समस्या सोडविण्याला आपण प्राधान्य देऊ व लवकरच त्यासाठी समस्या निवारण सभा बोलाविली जाईल, अशी ग्वाही जिल्हा परिषदेचे सभापती श्रीधर मोहोड यांनी दिली. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या शिष्टमंडळासोबत चर्चा करताना त्यांनी ही ग्वाही दिली.शिक्षक समितीच्या शिष्टमंडळाने मंगळवारी नवनिर्वाचित जिल्हा परिषद अध्यक्ष कालिंदा पवार, समाज कल्याण सभापती विजय राठोड, सभापती श्रीधर मोहोड यांची भेट घेतली. या भेटीत आरटीई २00९ नुसार राज्याच्या शिक्षण आयुक्तांनी सन २0१४-१५ पासून नैसर्गिक वाढीने पाचवा व आठवीच्या वर्गांना दिलेली मान्यता कायम ठेवून १९ सप्टेंबर २0१९ च्या शासन निर्णयानुसार नव्याने पाचवा व आठवा वर्ग सुरू करण्यासाठी निकषानुसार शासनाकडे प्रस्ताव पाठविण्याची हमी देण्यात आली.अहमदनगर व परभणी जिल्हा परिषदेने बीएलओचे काम रद्द करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे केलेल्या शिफारशीप्रमाणे जिल्हा परिषदेकडून जिल्हाधिकाऱ्यांकडे शिफारस करणे, मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्तीसाठी ओबीसी विद्यार्थ्यांना कास्ट सर्टिफिकेटची अट रद्द करण्यासाठी शासनाकडे शिफारस करणे, विषय शिक्षकांच्या पदोन्नत्या, विषय शिक्षकांना वेतनश्रेणी लागू करणे यासह प्रलंबित मागण्यांवर यावेळी चर्चा करण्यात आली.शिष्टमंडळात शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर नाकाडे, सरचिटणीस गजानन देऊळकर, यशवंत पवार, राधेश्याम चेले, विष्णू बुटले, विलास गुल्हाने, आशन्ना गुंडावार, जितेंद्र गुल्हाने, हरिहर बोके, विजय लांडे, महिला आघाडीच्या जिल्हा प्रमुख सुनिता जतकर, वनिता झुरळे, पुष्पा तायडे, नम्रता बिसने आदींचा समावेश होता.
झेडपी शिक्षकांच्या समस्या प्रलंबित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2020 06:00 IST
अहमदनगर व परभणी जिल्हा परिषदेने बीएलओचे काम रद्द करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे केलेल्या शिफारशीप्रमाणे जिल्हा परिषदेकडून जिल्हाधिकाऱ्यांकडे शिफारस करणे, मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्तीसाठी ओबीसी विद्यार्थ्यांना कास्ट सर्टिफिकेटची अट रद्द करण्यासाठी शासनाकडे शिफारस करणे, विषय शिक्षकांच्या पदोन्नत्या, विषय शिक्षकांना वेतनश्रेणी लागू करणे यासह प्रलंबित मागण्यांवर यावेळी चर्चा करण्यात आली.
झेडपी शिक्षकांच्या समस्या प्रलंबित
ठळक मुद्देसभापतींशी चर्चा : शिक्षक समितीचे शिष्टमंडळ भेटले, समस्या निकाली काढणार