यवतमाळ : यवतमाळ जिल्हा परिषदेने अमरावती विभागात यशवंत पंचायतराज अभियानात आपली मोहोर उमटविली आहे. कामकाजाच्या मूल्याकंनात अमरावती विभागात सर्वाधिक गुण प्राप्त करित यवतमाळ जिल्हा परिषदेने अव्वल स्थान पटकाविले आहे. राबविले जात आहे. त्यातूनच यवतमाळची निवड करण्यात आली. जिल्हा परिषदेने २०१३-१४ या वर्षात प्रशासकीय कामकाजाला गती दिली. आॅडिट पॅरा, रेकॉर्ड सॉर्टिग करण्यात आले. पेन्शनच्या रखडलेल्या केसेसचा निपटारा करण्यात आला. विविध योजनेसाठी आलेला निधी वेळेत खर्च केला. केवळ महिला बालकल्याण आणि समाजकल्याण विभागाने निधी खर्च केला नाही. त्यामुळे गुणांकन कमी झाले. जिल्हा परिषदेला दैनंदिन कामकाजासाठी १८ पैकील १७ गुण मिळाले. कर्मचारी व्यवस्थापनात १२ पैकी ९ गुण, नियोजन आणि अंदाजपत्रकासाठी आठ पैकी पाच गुण, उत्पन्न निर्मितीसाठी सात पैकी ४.२५ गुण, सर्वसाधारण कामगिरीसाठी २४ पैकील २०.७५ गुण, लेखे ठेवणे आणि पारदर्शक कारभारासाठी १३ पैकी ७ गुण आणि इतर मुद्दामध्ये ५.२५ गुण मिळाले आहे. त्यामुळेच एकंदर गुणांची टक्केवारी ६८.२५ झाली आहे. अमरावती जिल्हा परिषदेला ६७.७५ टक्के, बुलडाणा ६४.५० टक्के, अकोला ५७ टक्के, वाशिम ५२ टक्के गुण मिळाले. यवतमाळ जिल्हा परिषदेचे मूल्याकंन करण्यासाठी राज्यस्तरीय समिती येत आहे. बऱ्याच क्षेत्रात सुधारणेस वाव असुन त्यासाठी प्रयत्न केले जातील असे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मल्लीनाथ कलशेट्टी यांनी सांगितले. (कार्यालय प्रतिनिधी)
पंचायतराज अभियानात जिल्हा परिषद अव्वल
By admin | Updated: January 6, 2015 23:08 IST