शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषद पदाधिकारी हतबल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2018 22:16 IST

प्रशासन प्रमुख व इतर काही अधिकारी न सांगताच बैठकींना दांडी मारत असल्याने जिल्हा परिषदेचे पदाधिकारी हतबल ठरल्याचे दिसून येत आहे. खुद्द अध्यक्षांनाही वारंवार याचा प्रत्यय येत आहे.

ठळक मुद्देअधिकारी वरचढ : न सांगताच बैठकीला दांडी, सदस्यांमध्ये संताप

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : प्रशासन प्रमुख व इतर काही अधिकारी न सांगताच बैठकींना दांडी मारत असल्याने जिल्हा परिषदेचे पदाधिकारी हतबल ठरल्याचे दिसून येत आहे. खुद्द अध्यक्षांनाही वारंवार याचा प्रत्यय येत आहे.तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. दीपक सिंगला आणि नवीन पदाधिकाऱ्यांचे ‘ट्युनिंग’ बिघडले होते. प्रत्येक सभेत त्यांचे आणि पदाधिकाºयांसह सदस्यांचे खटके उडत होते. काही सदस्यांनी तर त्यांना चक्क ‘महाराष्ट्राचा बिहार करू नका’, येथपर्यंत सुनावले होते. त्यानंतर त्यांच्याविरूद्ध अविश्वास ठराव दाखल करण्याची हालचालही सुरू झाली होती. मात्र तत्पूर्वीच डॉ.सिंगला यांची येथून बदली झाली. त्यांच्या जागी नवीन वर्षात जलज शर्मा रूजू झाले. ते रूजू होताच पदाधिकारी खूष झाले. मात्र जस जसे महिने उलटू लागले, तस तसे आता पदाधिकारी नाराज दिसत आहेत.सुरूवातीला शर्मा यांच्याविषयी पदाधिकाऱ्यांच्या मनात चांगली प्रतिमा होती. गेल्या दोन महिन्यांपासून त्यांच्या विषयी पदाधिकाºयांचे मत मात्र बदलू लागल्याचे दिसत आहे. काही बैठकींना त्यांनी कुणालाही न सांगताच दांडी मारल्यामुळे हे मतांतर झाल्याची चर्चा आहे. खुद्द अध्यक्षांना कोणतीही कल्पना न देता ते दुसऱ्या बैठकींना निघून जातात, असा आक्षेप आहे. गुरूवारी आयोजित स्थायी समितीच्या बैठकीकडकेही ते फिरकले नाही. ही बैठक गणपूर्तीअभावी बारगळली. त्यामुळे संतापलेल्या अध्यक्षांनी त्यांची थेट आयुक्तांकडे तक्रार करण्याचा इशारा दिला. शर्मा यांना त्याचवेळी दुसरी महत्वाची बैठक होती, हेही तेवढेच खरे आहे. तथापि किमान अध्यक्षांना कल्पना देऊन त्यांनी त्या बैठकीला जायचे होते, असा पदाधिकाऱ्यांचा सूर आहे.पदाधिकाऱ्यांनीच बैठक केली तहकूबगुरूवारची स्थायी समितीची बैठक काहींनी मुद्दाम बारगळविली, अशी चर्चा आहे. बैठकीला अध्यक्ष आणि दोन सभापतींसह शिवसेनेचे दोन सदस्य उपस्थित होते. मात्र उपाध्यक्ष, इतर सभापती आणि सदस्य आले नव्हते. अध्यक्ष खास नागपूरहून या बैठकीसाठी यवतमाळात परतल्या. मात्र एका जबाबदार पदाधिकाऱ्याने आपल्या पक्षासह इतर काही सदस्यांना भ्रमणध्वनीवरून आधीच बैठकीला येऊ नका, अशी सूचना केली. ही बाब खुद्द एका महिला सदस्याच्या पतीनेच कबूल केली. परिणामी ही बैठक तहकूब झाली. यामुळे पदाधिकाºयांमध्येही विसंवाद असल्याचे दिसून येत आहे.

टॅग्स :zpजिल्हा परिषद