शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

युवक काँग्रेसची ‘वीरूगिरी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2018 20:51 IST

प्रकल्पात तुडूंब पाणी असूनही केवळ जीवन प्राधिकरणाच्या नियोजनशून्यतेमुळे कृत्रिम पाणीटंचाई निर्माण झाली आहे. मागील १५ दिवसांपासून नळच आले नाही. यापूर्वी अतिशय गढूळ पाण्याचा पुरवठा केला.

ठळक मुद्देकृत्रिम पाणीटंचाई : यवतमाळात १५ दिवसांपासून नळच नाही

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : प्रकल्पात तुडूंब पाणी असूनही केवळ जीवन प्राधिकरणाच्या नियोजनशून्यतेमुळे कृत्रिम पाणीटंचाई निर्माण झाली आहे. मागील १५ दिवसांपासून नळच आले नाही. यापूर्वी अतिशय गढूळ पाण्याचा पुरवठा केला. या विरोधात युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी दुपारी दर्डानगर पाण्याच्या टाकीवर चढून वीरूगिरी आंदोलन केले.शहरातील वाघापूर, लोहारा परिसरात नळाचे पाणीच आले नाही. त्यामुळे नागरिकांना पुन्हा टँकरने पाणी आणावे लागत आहे. पंधरा दिवसापूर्वी झालेल्या दूषित पाण्यामुळे अनेकांना ताप, जुलाब व त्वचेचे आजार झाले होते. प्रभाग १४, १५, २५, २६ मध्ये नळाचे पाणीच नाही. दर्डानगर व सुयोगनगर पाण्याच्या टाकीवरून पुरवठा होणेच बंद आहे. झाला तरी अतिशय अशुद्ध पाणी दिले जाते. वाघापूर परिसरातील वैशालीनगर, जयविजयचौक, नेताजीनगर, अंबानगर, पटवारी कॉलनी, राजस्व कॉलनी, पारसनगरी, वैभवनगर, राऊतनगर, मैथिलीनगर, चाणक्यनगर, एकतानगर, सिध्देश्वरनगर, शुभम कॉलनी, महाविरनगर, सानेगुरूजीनगर परिसरात सातत्याने दूषित पाणीपुरवठा केला. आता १५ दिवसापासून नळच नाही. यामुळे संतप्त झालेल्या युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी दर्डानगर पाण्याच्या टाकीवर चढून विरूगिरी आंदोलन केले.यावेळी काँग्रेसचे शहराध्यक्ष चंद्रशेखर चौधरी, युवकचे यवतमाळ विधानसभाध्यक्ष विक्की राऊत, काँग्रेस महिला आघाडीच्या शहराध्यक्ष उषा दिवटे, घनश्याम अत्रे, उमेश इंगळे, अरूण ठाकूर, अजय किन्हीकर, दत्ता हाडके, राजस तेलगोटे उपस्थित होते. सुमारे दीड तास पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केल्यानंतर कोणीच दखल न घेतल्याने पदाधिकाºयांनी जीवन प्राधिकरण कार्यालय गाठले. तेथेही कोणीच जबाबदार अधिकारी नसल्याने अखेर लिपिकाला निवदेन दिले.तीन दिवस पाणीपुरवठा बंद राहणारशहरात एकाच वेळी अनेक कामे सुरू आहे. वीज कंपनी भूमिगत केबल टाकत असताना पाणी पुरवठ्याची मुख्य पाईपलाईन मार्इंदे चौकात फुटली. या दुरूस्ती कामातही अनेक अडथळे येत आहे. येथे काम करताना एका कामगाराला विजेचा शॉक लागल्याची माहिती आहे. त्यामुळे तीन दिवस संपूर्ण शहराचाच पाणीपुरवठा बंद राहणार असल्याचे जीवन प्राधिकरणच्या सूत्राने सांगितले.

टॅग्स :congressकाँग्रेस